• Download App
    Durai Murugan उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याखेरीज दुसरे काम नाही; हिंदी द्वेषापोटी तमिळनाडूच्या मंत्र्याचे अनर्गल प्रलाप!!

    उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याखेरीज दुसरे काम नाही; हिंदी द्वेषापोटी तमिळनाडूच्या मंत्र्याचे अनर्गल प्रलाप!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका साधारण एक वर्षांवर आल्या असताना केवळ त्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळावा म्हणून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध वातावरण तापवायचे म्हणून वाटेल तसे प्रयत्न चालवले आहेत. त्यामध्ये संघराज्य व्यवस्थेला आव्हान देण्यापासून ते परापोटीचा हिंदी भाषाद्वेष करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश केला आहे, पण या प्रयत्नांमधून मोदी सरकार विरोधात वातावरण तापण्या बरोबरच तामिळनाडूतले मंत्री उत्तर भारतीयांच्या विरोधात वाटेल तसे बरळत सुटले आहेत.

    तामिळनाडूच्या द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारने ₹ हे चिन्ह हटवून बजेट सादर केले. यातून त्या सरकारने संघराज्य व्यवस्थेलाच आव्हान दिले, पण त्या पलीकडे जाऊन तमिळनाडूचे एक मंत्री दुराई मुरुगन यांनी उत्तर भारतीय विरुद्ध अक्षरशः गरळ ओकले. उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालून लोकसंख्या वाढविण्याखेरीज दुसरे काही काम नाही. त्यांच्याकडे मुलींना पाच नवरे करण्याची मूभा आहे. त्याला महाभारत असलेल्या द्रौपदीचा ऐतिहासिक दाखला देखील आहे. तामिळनाडूत ही संस्कृती नाही. तमिळ जनता जास्त सभ्य आहे, असे उद्गार दुराई मुरूगन यांनी काढले.

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी स्टालीन याने सनातन धर्माला डेंगी मलेरिया आणि एड्स असे संबोधून त्याच्या निर्मूलनाची गर्जना केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्याला अटकेपासून दिलासा दिला होता. त्यानंतर तामिळ मंत्र्यांचे अनर्गल प्रलाप वाढतच गेले. त्यातून हिंदी भाषेच्या द्वेषापोटी थेट उत्तर भारतीयांच्या विरोधात गरळ ओकायची संधी दुराई मुरूगन यांनी घेतली. हे केवळ तामिळनाडू विधानसभा निवडणूकीत बाकी सगळ्या पक्षांवर मात करून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता मिळाली पाहिजे यासाठी सुरू आहे.

    Durai Murugan says Another issue is delimitation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी