विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : सरकारी तेल कंपन्यांनी नुकताच पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नवीन दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. झालेली ही वाढ आजवरची नवी आणि विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात आली आहे. तर आता सामान्य नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी आता 100 हून अधिक रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे. ही परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये पाहायला मिळते आहे.
Due to the increasing prices of petrol and diesel indian finance minister nirmala seetharaman is worried
या सर्व परिस्थितीमुळे सामान्य माणूस हैराण तर आहेच. पण याची चिंता आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील लागली आहे. अमेरिकेमधील ब्लूमबर्ग क्विंटन या वृत्तवाहिनीनुसार सीतारमण यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कोरोना आणि कोरोनाचे दुष्परिणाम या संदर्भात न्यूयॉर्कमध्ये निर्मला सीतारामन यांनी नुकताच एक इंटरव्यू दिला आहे. या इंटरव्यू दरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असणारी आव्हाने आणि ती सावरण्याचा सरकार करत असणारे प्रयत्न यावर भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे आणि वाढणाऱ्या महागाईमुळे केंद्र सरकारच्या खर्चावर देखील मर्यादा येत आहेत. असे देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. जसजसे इंधनाचे दर दररोज वाढत आहेत त्यामुळे माझ्यासमोर खूप मोठे आव्हान आहे. अर्थ विभागातील आमची टीम याकडे पूर्णपणे लक्ष देऊन अभ्यास करत आहे. असे देखील यावेळी सीतारामन यांनी सांगितले आहे.
Due to the increasing prices of petrol and diesel indian finance minister nirmala seetharaman is worried
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपनं बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेबही बेईमान झाले नसते’ ; गुलाबराव पाटील यांचा घणाघात
- सोमय्यायांना काश्मीर मध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ, संजय राऊत यांनी साधला निशाणा
- अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार- राधाकृष्ण विखे पाटील
- महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना संजय राऊत यांचे आवाहन, गप्प बसू नका, टीकेला प्रतिटीका करा!