Thursday, 8 May 2025
  • Download App
    मोबाइल कंपन्यांची चांदी; निवडणूक प्रचारामुळे इंटरनेटच्या डेटाची मागणी ४० टक्के वाढली । Due to the election campaign, the demand for internet data increased by 40%

    मोबाइल कंपन्यांची चांदी; निवडणूक प्रचारामुळे इंटरनेटच्या डेटाची मागणी ४० टक्के वाढली

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कोरोनामुळे निर्बंध सुरू आहेत. त्यामुळे अभासी प्रचार शिगेला आहे. मात्र मोबाइल आणि इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांची चांगलीच चांदी झाली आहे. कारण ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशात इंटरनेट डेटाचा वापर विक्रमी होत आहे. रोज सुमारे ६३,८६७ टेरा बाईट (टीबी) इंटरनेटचा वापर होत आहे. Due to the election campaign, the demand for internet data increased by 40%

    प्रदेशात सुमारे १८ कोटी मोबाइलधारक आहेत. यातील सुमारे २ कोटी बीएसएनएलशिवाय तिन्ही खासगी कंपन्यांच्या डेटाचा वापर महिन्यात सुमारे ४० टक्के वाढला आहे. ८ जानेवारीला निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हा परिणाम दिसला आहे. मोबाइल कंपन्यांनी गेल्या एक महिन्यात सुमारे ७३ लाख नव्या जोडण्याही दिल्या आहेत.



    बीएसएनएलने १२.१० लाख नवे ग्राहक जोडले तर तीन खासगी कंपन्यांनी क्रमश: २६.६५ लाख, १९.२० लाख आणि १५.१७ लाख ग्राहक जोडले. बीएसएनएलचा रोज सरासरी डेटा वापर ८ जानेवारीनंतर १७६ टीबी झाला. यापूर्वी तो ११२ टीबी होता. तर, ३जी-४जी सेवा देणाऱ्या तीन खासगी कंपन्यांचा रोजचा डेटा ३३००० टीबीवरून ३५,५०० टीबी, २२००० वरून २८००० टीबी झाला असून तिसऱ्या अशाच खासगी कंपनीच्या डेटाचा खप वाढल्याचे दिसले.

    Due to the election campaign, the demand for internet data increased by 40%

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सरकारचा निर्णय, २१ विमानतळ १० मे पर्यंत बंद राहणार

    Harmony agreement : उद्योग अन् शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक सहकार्य सुनिश्चित करणारा सामंजस्य करार!

    Israel backs India : हवाई हल्ल्याविरुद्ध पाकिस्तानच्या समर्थनात चीन-तुर्किये; इस्रायलने भारताला पाठिंबा दिला