चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात झालेल्या करारावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नाराजी व्यक्त केली आहे. Due to India Iran agreement regarding Chabahar Port America got worried, gave a hint of restrictions!
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : चाबहार बंदराबाबत भारताने सोमवारी इराणशी मोठा करार केला. दोन्ही देशांमधील या 10 वर्षांच्या करारांतर्गत, भारत इराणच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर असलेल्या या बंदराच्या शाहिद बेहेश्ती टर्मिनलचा विकास करेल आणि त्यानंतर ते ऑपरेट करेल. हा करार भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असून चीनने पाकिस्तानात विकसित केलेल्या ग्वादर बंदराला प्रत्युत्तर म्हणून याकडे पाहिले जात आहे. मात्र, या करारामुळे अमेरिकेला मिरची लागल्याचे दिसत असून यामुळे भारतावर निर्बंध लादण्याचा इशाराही दिला आहे.
चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात झालेल्या करारावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भारत-इराण कराराबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘इराण आणि भारताने चाबहार बंदराशी संबंधित करारावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त आम्हाला माहिती आहे. आम्ही इराणवर निर्बंध लादले आहेत आणि आम्ही ते लागू ठेवत आहोत. कोणताही देश… जो कोणीही… इराणसोबत व्यवसाय करतो, त्यांना संभाव्य धोके आणि त्यांच्यावर लादले जाणारे निर्बंध याची जाणीव असली पाहिजे.
यानंतर पत्रकाराने विचारले की, या बंदराकडे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या ग्वादर बंदराची जागा म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे हे लक्षात घेऊन वॉशिंग्टन नवी दिल्लीला निर्बंधातून काही सूट देऊ शकेल का? यावर पटेल यांनी एक शब्दात ‘नाही…’ असे उत्तर दिले
इराण, अफगाणिस्तान, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान सारख्या देशांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी भारत चाबहार बंदरावर एक टर्मिनल विकसित करत आहे. इराणसोबतच्या नव्या करारामुळे इराणमार्गे दक्षिण आशिया आणि मध्य आशिया दरम्यानचा व्यापार मार्ग खुला होईल, पाकिस्तानमधील कराची आणि ग्वादर बंदरांना मागे टाकून मध्यपूर्वेतील व्यापारासाठी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरील अवलंबित्व संपुष्टात येईल.
Due to India Iran agreement regarding Chabahar Port America got worried, gave a hint of restrictions!
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!