• Download App
    अजस्त्र पणबुडीमुळेच कोणतेही राष्ट्र रशियाच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास घाबरतेय । Due to Big submarine of Russia Any nation Afraid to take military action against

    अजस्त्र पणबुडीमुळेच कोणतेही राष्ट्र रशियाच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास घाबरतेय

    वृत्तसंस्था

    मॉस्को : जगातील सर्वात मोठी अण्वस्त्रवाहू पाणबुडी रशियाकडे असून ती समुद्रातून अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह अन्य शहरांना लक्ष्य करण्याची क्षमता राखून आहे.या पणबुडीच्या धाकाने कोणतेही राष्ट्र रशियाच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यासाठी धजावत नाही. Due to Big submarine of Russia Any nation Afraid to take military action against

    समुद्र किनारपट्टीच्या रक्षण करण्यासाठी पाणबुडी महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना समुद्राचे सिंह म्हणून ओळखले जाते. अनेक देशांनी पाणबुडीचा ताफा बाळगला असला तरी रशियाकडे असलेल्या बेलगोरोड या पाणबुडीचा सामना करण्याची ताकद कोणत्याही देशात नाही. २०१९ मध्ये ती समुद्रात उतरविली गेली होती. महाकाय, ६०४ फूट लांब आणि विध्वंसक असलेली ही पाणबुडी शत्रूसाठी घातक आहे. एखाद्या ब्ल्यू व्हेल माशांच्या पाचपट मोठ्या आकाराची अवाढव्य पाणबुडी कोणतीही विशेष मोहीम यशस्वी पार पाडू शकते.



    या पाणबुडीत आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बसविली आहेत. ती वॅशिंग्टन, न्यूयॉर्क सारखी शहरे क्षणात नष्ट करू शकते. याशिवाय त्यातील एक अण्वस्त्रयुक्त टॉर्पेडो असून तो ब्लास्ट केला तर एखाद्या देशाच्या समुद्रात सुनामी आणू शकतो. ३०० फूट उंचीच्या समुद्रात लाटा निर्माण करू शकते. या सुनामीतून शत्रू राष्ट्रे वाचली तर अण्वस्त्र किर्णोत्सर्गाचा त्रास या देशांना अनेक वर्षे सहन करावा लागणार आहे. त्यामुळे कोणतेही राष्ट्र रशियाच्या वाटेल सध्या जात नाही आहे.

    Due to Big submarine of Russia Any nation Afraid to take military action against

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!