• Download App
    दुबई झाली शंभर टक्के पेपरलेस, सरकारचे सारे व्यवहार आता डिजीटल । Dubai became paperless

    दुबई झाली शंभर टक्के पेपरलेस, सरकारचे सारे व्यवहार आता डिजीटल

    वृत्तसंस्था

    दुबई : दुबईने शंभर टक्के ‘पेपरलेस’ होण्याची किमया साध्य केली आहे. सरकारी कामकाजातील कागदाचा वापर पूर्ण बंद झाल्याने १.३ अब्ज दिऱ्हाम (३५ कोटी डॉलर) आणि १.४ कोटी मनुष्यतास वाचल्याचा दावा दुबईचे युवराज शेख हामदान बिन महंमद बिन रशीद अल मख्तुम यांनी केला आहे.
    दुबईमधील सरकारचे सर्व अंतर्गत आणि बाह्य व्यवहार, प्रक्रिया आणि इतर जनसुविधांची कामे शंभर टक्के डिजिटल पद्धतीने होत आहेत. Dubai became paperless



    सर्व व्यवहारांवर सरकारची डिजिटल पद्धतीनेच देखरेख आहे. ‘जीवनाच्या सर्व क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या प्रवासातील हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा पार झाला असून आता भविष्यावर लक्ष केंद्रीत करून संशोधन आणि सर्जनशीलता यांचा आधार घेत वाटचाल करण्यावर आमचा भर असेल. जगातील आघाडीवरील डिजिटल राजधानी म्हणून दुबईने स्थान निर्माण केले असून जगातील इतर शहरांसाठी एक आदर्श प्रस्थापित केला आहे,’ असे शेख हामदान यांनी सांगितले.

    सरकारी कामकाज डिजिटल स्वरुपात सुरु करण्याचे अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि कॅनडा या देशांचे नियोजन आहे. मात्र, सायबर हल्ल्याच्या भीतीने या सर्व देशांमध्ये शंभर टक्के डिजिटल कामकाजाला विरोध होत आहे.

    Dubai became paperless

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!