• Download App
    कोरोना योद्धा : पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू यांची कर्तव्यनिष्ठा । DSP Shilpa Sahu, who done her DUTY When child in her stomach and a stick in her hand

    कोरोना योद्धा : पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू यांची कर्तव्यनिष्ठा

    पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू याची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद ठरली. कमांडो ट्रेनिंग घेऊन नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ बनलेल्या शिल्पा साहू यांची प्रेरक कहाणी.


    विशेष प्रतिनिधी

    रायपुर : कोरोना काळात फ्रंटलाईन योद्धयानी विशेषतः महिला अधिकाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत उत्तम काम केले. त्यांचे कार्य पाहून असेही होऊ शकते का ? यावर विश्वास कोणाचाही बसणार नाही. त्या पैकीच एक आहेत शिल्पा साहू. गर्भवती असताना डीएसपी शिल्पा साहू यांनी लॉकडाऊन प्रभावी लागू करण्यासाठी कर्तव्य बजावले आहे. हातात काठी घेऊन त्या रस्त्यावरील लोकांना घरी पाठवत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली. तेव्हा लोकांना धक्का बसला. एक गर्भवती महिला आपले व बाळाचे जीवन पणाला लावून लोकांना कोरोनापासून वाचवत आहे, हे पाहून अनेकांचे मतपरिवर्तन झाले. लोक त्यांचे ऐकू लागल्याने दंते वाड्यात कोरोनामुक्तीला काहीशी चालना मिळाली. DSP Shilpa Sahu, who done her DUTY When child in her stomach and a stick in her hand



    छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शिल्पा साहू यांचे कौतुक केले. शिल्पा साहू म्हणाल्या की अशा परिस्थितीत मी घरी राहू शकत नाही. लोकांनी घरी राहावे म्हणून मला रस्त्यावर उत्तरावेच लागणार आहे.

    दंतेवाड्यात, पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या शिल्पा साहू कोरोनात ड्युटी करत होत्या.तिला सुट्टी घेण्याचा सल्ला अनेकांनी दिला. २९ वर्षीय शिल्पा साहू म्हणाल्या की ” अशा परिस्थितीत मी घरी राहू शकत नाही.” शिल्पा साहूने गरोदरपणामुळे गणवेश घातला नाही, पण आवाज मात्र खणखणीत होता. डीएसपी शिल्पा साहू नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये दंतेश्वरी फायटरच्या महिला कमांडोचे नेतृत्व करत असत. ऑपरेशन दरम्यान त्यांनी एके -47 देखील हाताळली होती.

    नक्षल प्रभावित दंतेवाडामध्ये त्या महिला कमांडोसोबत ऑपरेशनला जात असत. पण, गरोदरपणामुळे फील्ड ड्युटीमधून ब्रेक घ्यावा लागला, पण तिने सुट्टी घेतली नाही. लॉकडाऊन लागू झाल्यापासून शिल्पा साहू कडक उन्हात ड्युटी करत राहिल्या.

    DSP Shilpa Sahu, who done her DUTY When child in her stomach and a stick in her hand

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली