• Download App
    पाकिस्तानी तस्करांकडून भारतात ड्रोनद्वारे पाठवले जातात ड्रग्ज; खुद्द पाक पंतप्रधानांच्या सल्लागाराची कबुली|Drugs sent by Pakistani smugglers to India via drones; Confession of Pakistan Prime Minister's Adviser himself

    पाकिस्तानी तस्करांकडून भारतात ड्रोनद्वारे पाठवले जातात ड्रग्ज; खुद्द पाक पंतप्रधानांच्या सल्लागाराची कबुली

    वृत्तसंस्था

    नवी ​दिल्ली : पाकिस्तानी तस्कर ड्रोनद्वारे भारतात ड्रग्जची तस्करही करत आहेत. त्यामध्ये बहुतांश हेरॉइनचा समावेश आहे, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे संरक्षण विषयक विशेष सहायक मलिक मुहंमद अहमद खान यांनी दिली. भारतातील पंजाबच्या सीमेलगत असलेल्या कसूर शहराच्या प्रांतीय विधानसभेचे (एमपीए) खान हे प्रतिनिधीत्व करतात.Drugs sent by Pakistani smugglers to India via drones; Confession of Pakistan Prime Minister’s Adviser himself



    पाकिस्तानी चॅनल जियो न्यूजचे पत्रकार हामिद मीर यांनी १७ जुलै रोजी आपल्या ट्विटर हँडलवर खान यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ते म्हणाले, पंतप्रधानांचे सल्लागार मलिक खान यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हेरॉइन पोहोचवण्यासाठी तस्कर पाकिस्तान-भारत सीमेजवळील कसूरच्या पूरग्रस्त भागात ड्रोनचा वापर करत आहेत.

    मुलाखतीच्या व्हिडिओ क्लिपमध्ये खान म्हणतात, हे (एलओसीजवळील कसूर) एक रेंजर्स क्षेत्र आहे. सीमा कायद्यांमुळे थोडे संवेदनशील आहे. पत्रकाराने मलिक खान यांना कसूरमध्ये सीमेपलिकडून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, निश्चितच ती (ड्रेनद्वारे तस्करी) होत आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे

    Drugs sent by Pakistani smugglers to India via drones; Confession of Pakistan Prime Minister’s Adviser himself

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज