२००७ मध्ये तेलंगणा उत्पादन शुल्क आणि निषेध विभागाने ३० लाख किमतीची ड्रग्स केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ११ प्रकरणांमध्ये ड्रग तस्करांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. Drugs Case: Summons sent to 10 people including Rana Daggubati and Rahul Preet! Know when the inquiry will take place?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ड्रग्ज बाबतीत बऱ्याच काळापासून तपास चालू आहे आणि या प्रकरणात सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. अद्यापही तपास चालू आहे. याचसंबंधी आता रकुल प्रीत सिंह आणि राणा दग्गुबतीसह १० जण चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
या लोकांना पाठवले समन्स
चार वर्षांच्या ड्रग्ज प्रकरणात सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली आहे.आता एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ईडीने रकुल प्रीत सिंहला ६ सप्टेंबरला, राणा दग्गुबतीला ८ सप्टेंबरला आणि रवी तेजाला ९ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच ज्यांना समन्स पाठवण्यात आले आहे, त्यांची नावे या प्रकरणात आरोपी म्हणून नाहीत, पण त्यांना फक्त चौकशीसाठी बोलावले जात आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण
२००७ मध्ये तेलंगणमध्ये ३० लाख किमतीची ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ११ प्रकरणांमध्ये ड्रग्ज तस्करांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
नंतर ईडीने तक्रारीवर आधारित या प्रकरणाचा तपास मनी लाँडरिंगच्या अँगलने सुरू केला होता. या प्रकरणात तेलंगणातून ३० जणांना अटक झाली असून ६२ जणांची चौकशी करण्यात आली आहे. यात ११ जण चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत.
Drugs Case: Summons sent to 10 people including Rana Daggubati and Rahul Preet! Know when the inquiry will take place?
महत्त्वाच्या बातम्या
- तेलंगणात “नारायण राणे.”…; मल्ला रेड्डींचे भर स्टेजवर मांडी आणि शड्डू ठोकून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आव्हान
- काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; परदेशी नागरिकांना सावधानतेचा इशारा
- ‘हसके लिया अफगाणिस्तान लढके लेंगे पाकिस्तान’; तालिबानी प्रवृत्तीची अमेरिकेला धास्ती; अण्वस्त्रही तालिबानी बळकावेल ?
- यूपीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होणार FIR दाखल, ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ