• Download App
    पत्नीला न कळवता सासऱ्यांच्या घरी बुलडोजर चालवला; नितीन गडकरींनी केला बऱ्याच वर्षानंतर केला गौप्यस्फोट|Drove a bulldozer to the father-in-law's house without informing the wife; Nitin Gadkari's told after many years

    पत्नीला न कळवता सासऱ्यांच्या घरी बुलडोजर चालवला; नितीन गडकरींनी केला बऱ्याच वर्षानंतर केला गौप्यस्फोट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पत्नीला न सांगताच रामटेक येथील सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केला.Drove a bulldozer to the father-in-law’s house without informing the wife; Nitin Gadkari’s told after many years

    हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या समवेत आज गडकरी यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा आढावा घेतला. आपल्या भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविल्याच्या या रोचक घटनेबद्दल सांगितले.



    सोहना येथील भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे अनुभव तेथे अभियंते आणि पत्रकारांसोबत शेअर केले. एका घटनेचा संदर्भ देत नितीन गडकरी म्हणाले, “मी नवविवाहित होतो. तेव्हा माझ्या सासऱ्यांचे घर रस्त्याच्या मधोमध येत होते. साहजिकच ही एक मोठी समस्या होती.

    वाहतुकीला घराचा अडथळा येत होता. अशा परिस्थितीत, त्यातून मुक्त होणे काळाची गरज होती. नितीन गडकरींनी सांगितले की संपूर्ण प्रकरण रामटेकचे आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या सासऱ्याच्या घरामुळे ते अडचणीत आले होते. पण, मी धर्माचे पालन करून पत्नीला न कळवता सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविला आणि रस्ता वाहतुकीसाठी सुलभ केला. त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय टळली. या त्यांच्या वाक्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.

    दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा खर्च २१०० कोटींवर

    दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या बांधकामाचा खर्च २१०० कोटींवर येणार आहे. जेवर विमानतळासाठी २१ किलोमीटरचे सहा पदरी हरित क्षेत्र मार्ग तयार केले जात आहे. रस्त्याकडेला असलेल्या लोकांना हरियाणातील ६ ठिकाणी सार्वजनिक सुविधा मिळतील. ५३००० कोटी रुपयांच्या १५ योजना आहेत, त्यापैकी १४ वर काम सुरू झाले आहे. येत्या काळात या सर्व प्रकल्पांच्या कामालाही गती येईल.

    सुविधा हव्या तर टोल भरावा लागेल

    नितीन गडकरी म्हणाले की, लोकांच्या माध्यमातूनच सरकारकडे पैसा येतो. जर तुम्हाला रस्त्यावर सर्व सुविधा हव्या असतील तर तुम्हाला टोल भरावा लागेल. खुल्या मैदानावरही विवाह होतात. पण, त्यासाठीही पैसा खर्च करावा लागतो.

    हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध

    केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, हरियाणातील ६ ठिकाणी रस्त्याच्या कडेला सार्वजनिक सुविधा पुरवल्या जातील. यामुळे स्थानिक उत्पादकांना प्राधान्य दिले जाईल. यामध्ये हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवाही देण्यात येणार आहे. आम्ही यामध्ये ड्रोन देखील वापरू जे उद्योग आणि व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल.

    जेवर विमानतळासाठी सहा पदरी मार्ग

    यूपीच्या लोकांनाही दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेचा लाभ मिळावा, यासाठी तयारी केली जात आहे. जेवर विमानतळ दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडले जाईल. त्यासाठी जेवर विमानतळाला जोडण्यासाठी३१ किलोमीटरचा सहा पदरी हरित क्षेत्र मार्ग केला जात आहेत. त्यासाठी २१०० कोटींचा खर्च येणार आहे.

    Drove a bulldozer to the father-in-law’s house without informing the wife; Nitin Gadkari’s told after many years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!