• Download App
    ड्रोनने बदलला गावांच्या विकासाचा चेहरा - पंतप्रधान मोदी |Drone change face of villages

    ड्रोनने बदलला गावांच्या विकासाचा चेहरा – पंतप्रधान मोदी

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ – ग्रामीण भागातील रहिवाशांना मालमत्तेच्या कागदपत्रांआधारे आतापर्यंत त्रयस्थाकडून कर्ज घ्यावे लागत होते. मात्र, स्वामित्व योजनेमुळे आता त्यांना बॅंकांकडून थेट कर्ज घेता येईल. छोटे हेलिकॉप्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रोनने गावांच्या विकासाचा चेहरा बदलला असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.Drone change face of villages

    स्वामित्व योजना प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हरियाना आणि कर्नाटकमध्ये राबविण्यात आली. आता, लोकांना मालमत्तेचे कार्ड देण्यासाठी संपूर्ण देशभरात ती राबविली जाईल. आतापर्यंत योजना राबविलेल्या राज्यांत २२ लाखांपेक्षा अधिक कुटुंबाना मालमत्तेचे कार्ड देण्यात आले.



    पंतप्रधानांच्या हस्ते २४ एप्रिल २०२० रोजी देशाचा ग्रामीण भाग स्वावलंबी आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी स्वामित्व योजनेचे उद्‌घाटन झाले. त्यातून गावांचे सर्वेक्षण आणि ग्रामीण भागाचे सुधारित तंत्रज्ञानासह मोजमाप केले जाते. ड्रोनद्वारे ग्रामीण भागातील मालमत्तेची मालकी स्पष्ट करण्याचा स्वामित्व योजनेचा हेतू आहे.

    Drone change face of villages

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    GST collection : डिसेंबरमध्ये GST संकलन 6.1% नी वाढून ₹1.74 लाख कोटींच्या पुढे; कर कपातीनंतरही महसुलात वाढ

    Vande Bharat : पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी-कोलकातादरम्यान धावणार; थर्ड एसीचे भाडे ₹2,300, वैष्णव म्हणाले- बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 पर्यंत येईल

    Indore  Contaminated : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे 14वा मृत्यू; 162 जण भरती; मृतांच्या नातेवाईकांनी चेक घेण्यास नकार दिला