वृत्तसंस्था
नवी दिल्ली :ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी घेतला आहे. Driving License, Rc Book Is valid Up To 31 September 2021
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्रालयाने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच हे निर्णय भाग आहेत. वरील ज्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे. त्यांच्यासाठी ही मुदतवाढ लागू आहे.
वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्याच्या सूचना मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या आहेत. या कालावधीत कागदपत्रांची मुदत संपली असेल, तरी त्यांना दंड करू नये,त्यांची आधीची कागदपत्रं ग्राह्य धरावीत, अशा सूचना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जारी केल्या आहेत.
वरील कालावधीत PUC सर्टिफिकेटची वैधता संपली असेल, तर नवीन सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. अन्यथा दंड भरावा लागेल.
Driving License, Rc Book Is valid Up To 31 September 2021
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टीचा पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख समुदायातून असेल; अरविंद केजरीवालांची घोषणा
- नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादात राज ठाकरे उतरले; नाव छत्रपती शिवाजी महाराजांचेच असावे, म्हणाले…!!
- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक