• Download App
    द्वारकाधीश मंदिरात ड्रेस कोड लागू; बर्मुडा, मिनी टॉप, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फ्रॉक आणि फाटलेल्या जीन्सवर प्रवेश नाही|Dress code enforced at Dwarkadhish Temple; Bermudas, mini tops, mini skirts, night suits, frocks and ripped jeans are not allowed

    द्वारकाधीश मंदिरात ड्रेस कोड लागू; बर्मुडा, मिनी टॉप, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फ्रॉक आणि फाटलेल्या जीन्सवर प्रवेश नाही

    प्रतिनिधी

    द्वारका : देशातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झाल्यानंतर आता गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरातील भाविकांच्या ड्रेसबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टच्या निर्णयानुसार, यापुढे कोणत्याही भाविकांना आखुड कपडे घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही.Dress code enforced at Dwarkadhish Temple; Bermudas, mini tops, mini skirts, night suits, frocks and ripped jeans are not allowed

    मंदिर ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगत मंदिर द्वारकेची प्रतिष्ठा राखण्यासाठी भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करावे लागतात. ड्रेस कोडबाबत गुजराती-हिंदी-इंग्रजी भाषांमध्ये लिहिलेले फलकही मंदिराबाहेर लावण्यात आले आहेत.



    या कपड्यात आलात तर प्रवेश मिळणार नाही

    मंदिराच्या बाहेरील फलकावर असे लिहिले आहे की, मंदिर हे दर्शनाचे ठिकाण आहे, स्वतःच्या प्रदर्शनासाठी नाही. मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी साधे कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करावा असे आवाहन करण्यात आले आहे. लहान कपडे, हाफ पँट, बर्मुडा, मिनी टॉप, मिनी स्कर्ट, नाईट सूट, फ्रॉक आणि फाटलेली जीन्स परिधान केलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

    यासंदर्भात विश्वस्त पार्थ तलसानिया यांनी सांगितले की, मंदिरात येणाऱ्या अनेक भाविकांच्या तक्रारीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. असे कपडे परिधान केल्याने इतर भाविकांचे लक्ष विचलित होत असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. त्यामुळे देशातील मंदिरांमध्ये आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

    मथुरेच्या राधा राणी मंदिरात हाच ड्रेस कोड

    नुकताच मथुरेच्या राधा राणी मंदिरातही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यानंतर यूपी, मध्य प्रदेशातील अनेक मंदिरांमध्ये हाच नियम लागू करण्यात आला आहे. मंदिरांमध्ये भाविकांना हिंदू संस्कृतीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे त्यांना योग्य कपडे घालण्यास सांगितले जात आहे.

    Dress code enforced at Dwarkadhish Temple; Bermudas, mini tops, mini skirts, night suits, frocks and ripped jeans are not allowed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक