• Download App
    डीआरडीओचे कोरोना प्रतिबंधक औषध दोन-तीन दिवसांतच बाजारात|DRDO's anti corona drug in two to three days

    डीआरडीओचे कोरोना प्रतिबंधक औषध दोन-तीन दिवसांतच बाजारात

    भारत सरकारच्या अनुसंधान आणि विकास संगठन (डीआरडीओ)ने विकसित केलेले कोरोना प्रतिबंधक औषध दोन-तीन दिवसांतच बाजारात येणार आहे. या औषधाच्या चाचणीत ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही,असे संशोधकांच्या पथकाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी सांगितले.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत सरकारच्या अनुसंधान आणि विकास संगठन (डीआरडीओ)ने विकसित केलेले कोरोना प्रतिबंधक औषध दोन-तीन दिवसांतच बाजारात येणार आहे.DRDO’s anti corona drug in two to three days

    या औषधाच्या चाचणीत ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही,असे संशोधकांच्या पथकाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी सांगितले.



    भट्ट म्हणाले, पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांना हे औषध मिळायला सुरूवात होईल. हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जूनपर्यंत सगळ्या रुग्णांना हे औषध उपलब्ध होणार आहे.

    डीआरडीओच्या रिसर्च लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) चे वैज्ञानिक डॉ. भट्ट म्हणाले ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) च्या मान्यतेनंतर डॉ. रेड्डीच्या प्रयोगशाळेने त्याच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे.

    व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनसह आहेत असे रुग्ण या औषधाने लवकर बरे होऊ शकतात. या औषधाचे उत्पादन वेगानं सुरू असून जूनपासून या औषधाचे 50 हजार ते एक लाख डोस दररोज लोकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

    २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) हे कोरोनावरील नवे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे. कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत याची ओळख हे औषध पटविते व त्या पेशींचे कार्य सुधारते.

    रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते. देशात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना हे गुणकारी औषध त्यांच्यासाठी वरदान ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

    या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन आॅक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही.

    डॉ. भट्ट म्हणाले हे औषध सर्वसामान्यांनाही परवडणाºया किंमतीत असावे यासाठी डीआरडीओचा प्रयत्न आहे. साधारणत: पाचशे ते सहाशे रुपये किंमत असेल. पॅकींग आणि इतर गोष्टींचा विचार करता

    औषधाची पहिली खेप बाजारात आल्यावर निश्चित किंमत सांगता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावरही हे औषध प्रभावी ठरेल. मात्र, सुरूवातीच्या टप्यात दिल्यास जास्त उपयोग होईल.

    DRDO’s anti corona drug in two to three days

    Related posts

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!