पिनाका रॉकेट प्रक्षेपक प्रणालीची क्षमता वाढवत DRDOने शनिवारी त्यांच्या नवीन आवृत्तीची Pinaka-ER (विस्तारित श्रेणी) यशस्वी चाचणी घेतली. पोखरण रेंजमध्ये या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर सिस्टिमची चाचणी पूर्ण झाली. DRDO ने त्याची रचना आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) आणि पुण्याच्या हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (HEMRL) यांच्या सहकार्याने केली आहे. DRDO successfully test-fires upgraded version of Pinaka rocket
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पिनाका रॉकेट प्रक्षेपक प्रणालीची क्षमता वाढवत DRDOने शनिवारी त्यांच्या नवीन आवृत्तीची Pinaka-ER (विस्तारित श्रेणी) यशस्वी चाचणी घेतली. पोखरण रेंजमध्ये या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर सिस्टिमची चाचणी पूर्ण झाली. DRDO ने त्याची रचना आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) आणि पुण्याच्या हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (HEMRL) यांच्या सहकार्याने केली आहे.
हे तंत्रज्ञान भारतीय उद्योग क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. माहितीनुसार, ER पिनाका ही मागील दशकापासून सैन्यात सेवा करत असलेल्या पिनाकाची सुधारित आवृत्ती आहे. नवीन तंत्रज्ञानासह उदयोन्मुख गरजा लक्षात घेऊन ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. अलीकडेच चीनसोबतच्या तणावादरम्यान भारताने आपली बाहुबली ‘पिनाक’ रॉकेट यंत्रणा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात केली आहे. भगवान महादेवाचे धनुष्य ‘पिनाक’च्या नावावर असलेले हे मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर पूर्णपणे स्वदेशी आहे, जे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) तयार केले आहे.
DRDO successfully test-fires upgraded version of Pinaka rocket
महत्त्वाच्या बातम्या
- Omicron @ 33 : दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण, महाराष्ट्रात ३ वर्षांची मुलगी बाधित, मुंबईत कलम 144 लागू
- विश्वविजयी फुटबॉल स्टार दिएगो मॅराडोना ह्यूबोल्ट घड्याळ आसाम मधून जप्त; वाजिद हुसेन या चोराला अटक
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई
- इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी