drdo successfully test : भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आज एक मोठे यश संपादित केले आहे. आत्मनिर्भर भारतअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित लो वेट, फायर अँड फरगेट मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गायडेड मिसाईल (एमपीएटीजीएम) ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वावलंबी भारताला चालना देण्यासाठी आणि सैन्याची ताकद वाढविण्यासाठी डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. एमपीएटीजीएम व्यतिरिक्त नवीन पिढीतील आकाश क्षेपणास्त्राची (आकाश-एनजी) देखील यशस्वी चाचणी घेण्यात आली. drdo successfully test fired indigenously developed mpatgm missile
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आज एक मोठे यश संपादित केले आहे. आत्मनिर्भर भारतअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित लो वेट, फायर अँड फरगेट मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गायडेड मिसाईल (एमपीएटीजीएम) ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वावलंबी भारताला चालना देण्यासाठी आणि सैन्याची ताकद वाढविण्यासाठी डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. एमपीएटीजीएम व्यतिरिक्त नवीन पिढीतील आकाश क्षेपणास्त्राची (आकाश-एनजी) देखील यशस्वी चाचणी घेण्यात आली.
ओडिशाच्या किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी रेंज (आयटीआर) वरून आज डीआरडीओने आकाश-एन-एजी अद्ययावत क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या डागले, अशी माहिती डीआरडीओने दिली आहे. याव्यतिरिक्त डीआरडीओने सांगितले की, एमपीएटीजीएम क्षेपणास्त्राने अचूकतेने आपले लक्ष्य वेधून त्यास उडवून दिले. या क्षेपणास्त्राच्या मारक शक्तीने शत्रू देशांनाही धडकी भरेल.
डीआरडीओने सांगितले की, हे क्षेपणास्त्र थर्मल साइटसह एकीकृत मानव-पोर्टेबल लाँचरमधून प्रक्षेपित केले गेले आणि त्यांनी डमी टँकला लक्ष्य केले. हे क्षेपणास्त्र थेट अटॅकिंग मोडमध्ये लक्ष्यावर आदळले आणि अचूकतेने ते नष्ट केले. याच्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने म्हटले की, सर्व मिशन उद्देशांना पूर्ण करण्यात आले आहे, मिसाइलचे यापूर्वीच कमाल सीमेसाठी यशस्वीरीत्या उड्डाण परीक्षण घेण्यात आले होते. याशिवाय मिसाइल अत्याधुनिक लघु इन्फ्रारेड इमेजिंग सीकरसोबत उन्नत एव्हियोनिक्सनेही युक्त करण्यात आले आहे.
drdo successfully test fired indigenously developed mpatgm missile
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारच्या विरुद्ध ममता बॅनर्जी आक्रमक, म्हणाल्या -भाजपला सत्तेबाहेर करेपर्यंत ‘खेला होबे’
- CAA-NRC भारताच्या मुस्लिम नागरिकांविरुद्ध नाहीत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
- अमेरिकेन संस्थेचे अजब तर्कट, अवघ्या जगात 41 लाख कोरोना मृत्यू असताना एकट्या भारतात 49 लाख मृत्यू झाल्याचा दावा, कोणी लिहिलाय हा रिपोर्ट? वाचा सविस्तर…
- नवज्योतसिंग सिद्धू यांचा मेगा शो, आमदारांसह गाठले सुवर्ण मंदिर, कॅप्टनची माफी मागण्यास तयार नाहीत
- राज कुंद्राचं पॉर्नचं साम्राज्य : दिवसाला 20 हजार रुपये किरायाने घ्यायचे बंगला, 20 ते 25 वर्षांच्या स्ट्रगलिंग अभिनेत्रींना ओढायचे जाळ्यात