विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केलेल्या कोरोनावरील ‘२-डीजी’ या औषधाचे युद्धपातळीवर उत्पादन केले जाणार असून यासंदर्भातील तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्याची तयारी देखील संस्थेकडून दर्शविण्यात आली आहे.DRDO increasing production of medicine
डॉ. रेड्डीज लॅबच्या सहाकार्याने या औषधाची निर्मिती केली आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारामध्ये हे औषध दुधारी शस्त्र ठरणार असून यामुळे बाधित रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तर होतेच पण त्याचबरोबर त्यांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व देखील कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
हे औषध दिल्यानंतर रुग्णांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येत असल्याचे दिसून आले आहे.या औषधाच्या उत्पादनासाठी इच्छुक असणाऱ्या कंपन्यांना त्यांचे अर्ज ईमेलच्या माध्यमातून १७ जूनपर्यंत सादर करावे लागतील. ज्या कंपन्या या औषधाची निर्मिती करण्यास इच्छुक आहे
त्यांची टेक्निकल ॲसेसमेंट कमिटीच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येईल. देशातील तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशा पंधरा कंपन्यांनाच हे औषध निर्मितीचे तंत्रज्ञान देण्यात येईल. जो पहिल्यांदा येईल त्याला प्राधान्य या तत्त्वावर याचे वाटप केले जाणार आहे.
DRDO increasing production of medicine
महत्त्वाच्या बातम्या
- लसीबाबत अल्पसंख्याक समाजाच्या मनातील शंकाकुशंका सरकार दूर करणार
- अवाढव्य डायनोसोर्स पृथ्वीवरून कसे नष्ट झाले
- भारतीय हवाई दल पुढील वर्षी होणार आणखी सुसज्ज, ३६ राफेल विमाने होणार समाविष्ट
- कामगारांचे किमान वेतन ठरविण्यासाठी मिश्रा समितीचा स्थापना
- टीव्ही सिरियलमधील दोन अभिनेत्रींना चोरीप्रकरणी अटक, काम नसल्याने कृत्य