DRDO Developed DIPCOVAN : कोरोना रुग्णांसाठी 2-डीजी औषधाच्या शोधानंतर DRDOने आता आणखी एक पराक्रम केला आहे. संरक्षण संशोधन संस्थेने कोरोना व्हायरस अँटीबॉडी टेस्ट किट डिझाइन केली आहे. या किटला ‘DIPCOVAN’ असे नाव देण्यात आले आहे. DRDO Developed DIPCOVAN To Measure Antibodies in Corona Patients Read story
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांसाठी 2-डीजी औषधाच्या शोधानंतर DRDOने आता आणखी एक पराक्रम केला आहे. संरक्षण संशोधन संस्थेने कोरोना व्हायरस अँटीबॉडी टेस्ट किट डिझाइन केली आहे. या किटला ‘DIPCOVAN’ असे नाव देण्यात आले आहे.
या किटच्या माध्यमातून SARS-CoV-2 विषाणूसोबतच न्यूक्लियोकॅप्सिड (S&N)प्रथिनेदेखील 97 टक्क्यांच्या उच्च संवेदनशीलतेसह आणि 99% च्या विशिष्टतेसह शोधली जाऊ शकतात. दिल्लीस्थित व्हॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ही किट विकसित करण्यात आली आहे. हे किट पूर्णपणे स्वदेशी आहे आणि ही येथील शास्त्रज्ञांनीच विकसित केली आहे. त्यानंतर दिल्लीतील विविध कोविड रुग्णालयांमधील 1000 पेक्षा जास्त रुग्णांच्या नमुन्यांची विस्तृत तपासणी करून याची क्षमता तपासण्यात आली आहे.
गेल्या एक वर्षात या किटच्या तीन तुकड्यांना वैधता देण्यात आली आहे. एप्रिल 2021 मध्ये या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिली. आता मेमध्ये या किटच्या उत्पादनासही ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यताही दिली आहे. आता ही किट खुल्या बाजारात विकली जाऊ शकते.
DIPCOVAN किट तयार करण्याचा हेतू हा मानवी शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा शोधणे आहे. या किटची वैधता 18 महिने असेल. व्हॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओने ही किट तयार केली आहे.
व्हॅनगार्डतर्फे जूनच्या पहिल्या आठवड्यात याची लाँचिंग केली जाईल. पहिल्या तुकडीत 100 किट उपलब्ध केल्या जातील. यानंतर दर महिन्यात 500 किट तयार होतील. या किटची किंमत प्रति चाचणी सुमारे 75 रुपये असेल. ही किट एखाद्या व्यक्तीची कोरोनाशी लढण्याची क्षमता आणि त्याच्या आधीच्या हिस्ट्रीबाबत शोधण्यात मदत करेल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
दरम्यान, याच आठवड्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोव्हिसेल्फ नावाच्या होम टेस्टिंग किटलाही मान्यता दिली आहे, ही जलद प्रतिजैविक चाचणी किट आहे. या किटच्या मदतीने, लोक घरी बसून स्वत:ची कोरोना चाचणी करू शकतील.
DRDO Developed DIPCOVAN To Measure Antibodies in Corona Patients Read story
महत्त्वाच्या बातम्या
- गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ
- नंदिग्रामच्या पराभवानंतर ममतांचे सावध पाऊल, आता भवानीपूरमधून लढणार पोटनिवडणूक, आ. शोभनदेव चटर्जींचा राजीनामा
- कोरोना काळात RBI ची केंद्र सरकारला मोठी मदत, सरप्लस अमाउंटमधून 99,122 कोटी हस्तांतरणाचा बोर्डाची मंजुरी
- अँटिलिया केसमधील आरोपी एपीआय काझीही पोलीस सेवेतून बडतर्फ, पुरावे मिटवल्याचा आरोप
- खळबळजनक : चीनच्या लॅबमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती, लीक झाल्यानेच जगभरात प्रसार, अमेरिकी शास्त्रज्ञाचा संशोधनपर लेख