विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशाच्या मुख्य सल्लागारपदी डॉ.व्ही.अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती केली आहे. Dr. V. Anantha Nageswaran appointed as chief economic adviser
३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून, १फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पूर्वी केंद्र सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. नागेश्वरन यांची नियुक्ती केली आहे.त्यांनी तात्काळ पदभारही स्वीकारला आहे.
पंतप्रधान मोदी यांचे सल्लागार
अनंत नागेश्वरन हे २०१९ ते २०२१ पर्यंत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य होते. ते लेखक, शिक्षक, मार्गदर्शकही आहेत. ते भारतातील प्रसिद्ध बिझनेस स्कूल आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक असून सिंगापूरच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते शिक्षकही राहिले आहेत.
आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी शिक्षण घेतले.
IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते. क्रे विद्यापीठात अर्थशास्त्राचे व्हिजिटिंग प्रोफेसरही राहिले आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM-A) मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. तसेच मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवीही घेतली आहे.
Dr. V. Anantha Nageswaran appointed as chief economic adviser
महत्त्वाच्या बातम्या
- एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल
- ADR Report : भाजपने 2019-20 मध्ये 4847 कोटींची संपत्ती जाहीर केली, इतर राजकीय पक्षांची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर…
- दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक, ९ महिलांसह ११ आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती