वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Dr. Muzammil Ganai दिल्ली स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या फरिदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीशी जोडलेले डॉ. मुजम्मिल गनई, डॉ. शाहीन सईद, डॉ. आदिल अहमद राथर आणि मौलवी इरफान यांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. यापूर्वी तपास पथकाने फरिदाबादच्या धौज गावात राहणाऱ्या एका टॅक्सी ड्रायव्हरच्या घरातून पिठाची गिरणी आणि काही इलेक्ट्रॉनिक मशीन जप्त केल्या. यात धातू वितळवण्याचे मशीनदेखील आहे. तपास संस्थेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, याच गिरणीत डॉ. मुजम्मिल युरिया दळून आधी बारीक करत होता, त्यानंतर मशीनने त्याला शुद्ध करत होता. यानंतर केमिकल मिसळून तो स्फोटक बनवत असे. केमिकल अल फलाहच्या लॅबमधून चोरले होते. मुजम्मिलने दिलेल्या माहितीवरूनच ड्रायव्हरला पकडण्यात आले आहे. Dr. Muzammil Ganai
त्याने तपास पथकाला सांगितले की, मुजम्मिल गिरणी ड्रायव्हरच्या घरी ठेवून गेला होता. तेव्हा त्याने याला बहिणीचा हुंडा असल्याचे सांगितले होते. थोड्या दिवसांनी तो गिरणी धौजला घेऊन गेला. मुजम्मिल ज्या खोलीत युरिया दळत असे, तेथूनच ९ नोव्हेंबरला पोलिसांनी ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटके जप्त केली होती. त्याने धौजपासून ४ किमी दूर फतेहपूरतगाच्या दुसऱ्या खोलीत २५५८ किलो युरिया जमा करून ठेवलाहोता. तो या खोलीतून युरियाच्या गोण्या धौजला घेऊन जात असे. विशेष म्हणजे, ड्रायव्हरची मुजम्मिलशी ओळख मुलाच्या उपचारादरम्यान रुग्णालयात झाली होती. Dr. Muzammil Ganai
कश्मीर टाईम्सवर छापा: जम्मू-काश्मीर पोलीसच्या तपास संस्थेने कश्मीर टाईम्स वृत्तपत्राच्या जम्मू कार्यालयावर छापा मारला.
२०२० चे दिल्ली दंगल प्रकरण ‘आता डॉक्टरही देशविरोधी कारवायांमध्ये सामील होताहे’
नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी २०२० च्या दंगलीच्या प्रकरणात उमर खालिद, शरजील इमाम यांच्या याचिकांना सर्वोच्च न्यायालयात विरोध केला. गुरुवारी पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आता डॉक्टर आणि इंजिनियर त्यांच्या व्यवसायाचे काम सोडून देशविरोधी गतिविधींमध्ये सामील होत आहेत. पोलिसांच्या वतीने उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी न्यायालयात शरजील इमामचे भडकाऊ व्हिडिओ देखील दाखवले. राजू यांनी सांगितले की, ही भाषणे जामिया, शाहीन बाग यांसारख्या ठिकाणी दिली गेली होती, ज्याचा उद्देश हिंसक प्रदर्शन भडकावणे होता. त्यांनी सांगितले की, बौद्धिक दहशतवादी जमिनीवर काम करणाऱ्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक असतात. न्यायालयाने दिल्ली पोलिसांचे म्हणणे ऐकले आणि या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार दुपारपर्यंत पुढे ढकलली.
Dr. Muzammil Ganai Explosives Urea Mill Al Falah University NIA Photos Videos Investigation
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरी यांचे ‘एनएचएआय’ला आदेश, नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा
- कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा!!; भाजपच्या स्वबळाचा राष्ट्रवादीला तोटा!!
- Mahua Moitra : बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांना अटक; महुआंनी केली भारताशी तुलना, भाजपचे प्रत्युत्तर
- S Jaishankar : SCO बैठक, जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये पुतीन यांची घेतली भेट, परराष्ट्र मंत्री म्हणाले- आम्ही आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक पाऊल