Tuesday, 13 May 2025
  • Download App
    डॉ. मनमोहन सिंग प्रचंड कर्तृत्ववान पण, यूपीए राजवटीत अर्थव्यवस्था ठप्प; नारायण मूर्तींचे परखड मत Dr. Manmohan Singh was very successful, but the economy stagnated during the UPA regime

    डॉ. मनमोहन सिंग प्रचंड कर्तृत्ववान पण, यूपीए राजवटीत अर्थव्यवस्था ठप्प; नारायण मूर्तींचे परखड मत

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : डॉ. मनमोहन सिंग प्रचंड कर्तृत्ववान नेते आहेत. 1991 च्या आर्थिक सुधारणांचे श्रेय त्यांना आहे. पण दुर्दैवाने यूपीएच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. कारण निर्णयांना फारच विलंब लावला जात होता. त्यामुळे देश चीन बरोबर स्पर्धा करू शकला नाही, असेच परखड मत इन्फोसिसचे सह संस्थापक डॉ. नारायण मूर्ती यांनी व्यक्त केले आहे. Dr. Manmohan Singh was very successful, but the economy stagnated during the UPA regime

    आयआयएम अहमदाबादच्या विद्यार्थ्यांसमोर स्टार्ट अप वरील पुस्तकाच्या एका चर्चेत सहभागी होताना त्यांनी भारताच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षमतेविषयी भाष्य केले.

    डॉ. नारायण मूर्ती म्हणाले :

    भारतीय अर्थव्यवस्थेच्या क्षमतेविषयी कोणाला शंका नाही. पण यूपीए राजवटीच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या प्रचंड कर्तृत्ववान असलेल्या नेत्याकडे सरकारची सूत्रे असली तरी अर्थव्यवस्था मात्र ठप्प होती. निर्णय घ्यायला फार विलंब लावला जात होता आणि त्याचा परिणाम देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर झाला होता. 2008 ते 2012 या कालावधीत मी लंडनच्या एचएसबीसी वर संचालक होतो. त्या काळात बोर्ड मीटिंगमध्ये चीनचा उल्लेख तीन-चार वेळा येऊन जायचा, त्यावेळी भारताचा उल्लेख एखाद्या वेळेला व्हायचा. भारताला जागतिक पातळीवर तितकीशी पत नव्हती. माझ्या चार वर्षांच्या एचएसबीसीच्या कालावधीत चीनचा उल्लेख 30 वेळा झाला तर भारताचा उल्लेख एखाद्या वेळेला झालेला मला आढळला आहे. 1978 ते 2012 पर्यंत 44 वर्षे चीनने भारताला सहा पटीने मागे टाकले आहे. याचा अर्थ असा नाही की भारतात क्षमता नाही पण निर्णय वेगात घेतले पाहिजेत. नव्या पिढीला उद्योगासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आता भारतात स्टार्ट अप्स आणि मेक इन इंडिया सारख्या योजनांमुळे उद्योजकांना निश्चित मोठा वाव आहे. निर्णय प्रक्रिया देखील वेगाने होताना दिसत आहे. भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली आहे आणि पत देखील वाढली आहे. पण यापुढे चीनशी स्पर्धा करून त्या देशाला मागे टाकण्याची जबाबदारी नव्या पिढीची आहे आणि ती उत्साहाने आणि गांभीर्याने पुढे नेली पाहिजे, असा सल्ला नारायण मूर्ती यांनी दिला आहे.

     परखड आणि सटीक भाष्य

    नारायण मूर्ती हे आपल्या सौम्य पण परखड भाष्यासाठी ओळखले जातात. त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी सटिक आणि भविष्यवेधी भाष्य करणे हे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ उद्योगपतीने भारत आणि चीन यांची तुलना करून मर्मस्थाने ओळखणे आणि ती तरुण पिढीला समजावणे याला विशेष महत्त्व आहे.

    Dr. Manmohan Singh was very successful, but the economy stagnated during the UPA regime

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला

    Posters of Pahalgam : पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध, २० लाख रुपयांचा इनाम जाहीर