नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेली काही वर्षे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनाठायी टीका करून त्यांची बदनामी करत असताना काँग्रेस अनेकदा अडचणीत आली. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसला सावरकरांचा राजकीय विरोध नेमका कसा करायचा??, याचा “राजकीय मंत्र” देऊन ठेवला होता, याची आज आठवण झाली.
यूपीए सरकार असताना तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातल्या स्वातंत्र्य ज्योती वरून सावरकरांच्या काव्यपंक्ती हटविल्या होत्या. त्यांची “माफीवीर” म्हणून बदनामी करायला सुरुवात केली होती. त्यातच राहुल गांधी अडकले. त्यांनी देखील सावरकरांची बदनामी केली. त्यामुळे यूपीए सरकार अडचणीत आले. त्यावेळी मुंबईतल्या एका पत्रकार परिषदेमध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सावरकरांविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी जे उत्तर दिले होते, तो खरं म्हणजे काँग्रेससाठी मोठा राजकीय वस्तूपाठ होता. राहुल गांधींसकट काँग्रेसच्या नेत्यांनी तो गिरवला असता, तर राहुल गांधींना सावरकरांच्या बदनामीसाठी कोर्टाचे खेटे घालायला लागले नसते.
त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले होते, सावरकरांना काँग्रेस “देशभक्त” निश्चित मानते. इंदिराजींनी त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढले होते, याची आठवण मनमोहन यांनी करून दिली होती, पण त्याचवेळी काँग्रेस सावरकरांच्या हिंदुत्व या राजकीय तत्त्वज्ञानाशी सहमत नाही, असे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले होते. यातून सावरकरांच्या व्यक्तीमत्वाविषयी, देशासाठी सावरकरांनी केलेल्या त्यागाविषयी मनमोहन सिंग यांनी आदर व्यक्त केला होता, पण त्यांच्या राजकीय विचारप्रणाली विषयी मतभेद व्यक्त केले होते, ते देखील सभ्य भाषेत!!
हा काँग्रेससाठी खरं म्हणजे राजकीय वस्तूपाठ होता. एखाद्या नेत्याचे योगदान कसे स्वीकारायचे आणि त्याचे राजकीय तत्वज्ञान पटत नसेल, तर ते कसे नाकारायचे हे डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिले होते. पण दुर्दैवाने आज राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग यांचा त्यावेळचा वस्तूपाठ विसरले. ते सावरकरांची बदनामी करत राहिले. त्यामुळेच राहुल गांधींना आज कोर्टाचे खेटे घालावे लागत आहेत.
Dr. Manmohan Singh said, Savarkar was patriot, but Congress disagreed his hindutva philosophy
महत्वाच्या बातम्या
- Governor : माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरचे, तर जनरल व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल!!
- छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
- Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईने आता अमेरिकेत निर्माण केली दहशत!
- Delhi elections : दिल्ली निवडणुकीपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचे दणादण बनवले जात होते मतदार कार्ड