विशेष प्रतिनिधी
पुणे: महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला आणि संपूर्ण मानवतेला प्रेरणा दिली. मात्र, आधुनिक काळात शांतता टिकवण्यासाठी लष्करी ताकद अत्यावश्यक आहे, असे मत ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व वॉशिंग्टन डी.सी. येथील बे अटलांटिक विद्यापीठातील प्राध्यापक पाओलो वॉन शिराक यांनी व्यक्त केले.
डॉ. अजेिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ (ADYPU), पुणे, आणि ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूट (GPI), वॉशिंग्टन डी.सी., यांच्यात रणनीतिक भू-राजकीय अभ्यासाच्या क्षेत्रात शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार (MoU) झाला आहे.
“रणनीतिक भू-राजकीय आणि सुरक्षा मुद्दे” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान हा करार करण्यात आला. या करारांतर्गत एडीवायपीयू – जीपीआय चॅप्टरची स्थापना करण्यात आली असून, यात संयुक्त संशोधन उपक्रम, शैक्षणिक देवाणघेवाण, विशेष अभ्यासक्रम आणि कार्यशाळांचा समावेश असेल.
प्रा. पाओलो वॉन शिराक यांनी सांगितले की, “गांधीजींच्या अहिंसेच्या शिकवणी आजही प्रेरणादायी आहेत. मात्र, आजच्या जागतिक परिस्थितीत शांतता टिकवण्यासाठी लष्करी ताकदीसह विचारशीलतेची गरज आहे. त्यासाठी आर्थिक ताकद वाढविणे गरजेचे आहे. अमेरिकेत कल्याणकारी योजनांमुळे लष्करी खर्च कमी होत आहे. जागतिक पातळीवर समोर येत असलेल्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक ठरू शकते.
डॉ. अजेिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. अजेिंक्य डी. वाय. पाटील म्हणाले हा सामंजस्य करार जागतिक सहकार्याचे प्रतीक आहे. या करारामुळे संशोधक, विद्यार्थी आणि धोरणकर्त्यांना जागतिक प्रश्नांवर विचारमंथन आणि संशोधनाची संधी मिळेल.
डॉ. अजेिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन यांनी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “जीपीआय सोबत झालेला हा करार एक ऐतिहासिक टप्पा आहे. अशा प्रकारचा करार करणारे एडीवायपीयू हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना जागतिक भू-राजकीय अभ्यासात नवे दृष्टिकोन मिळतील.
या परिषदेतील प्रमुख वक्ते आणि भू-राजकीय तज्ज्ञ डॉ. निशिकांत ओझा यांनी या सहकार्याचे कौतुक करताना सांगितले, ” एडीवायपीयू – जीपीआय यांच्यातील भागीदारी विचारशक्तीला चालना देणारी आणि जागतिक पातळीवर समस्या सोडवण्याची मोठी संधी निर्माण करणारी आहे. अमेरिका आणि भारताला एकाच समान शत्रू सोबत लढायचे आहे. बंगालच्या उपसागरातील सेंट मार्टिन बेटाचे भू राजकीय महत्त्व ही त्यांनी सांगितले
Dr. Ajinkya D. Y. Patil MoU between University and Global Policy Institute
महत्वाच्या बातम्या
- Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप
- Delhi : दिल्लीतील ४०० शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
- Sanjay Raut : संजय राऊतांना अचानक झाली भाजपची आठवण अन् काँग्रेसला दिलेला सल्ला
- PM Modi : IMDच्या १५० व्या स्थापना दिनी पंतप्रधान मोदींनी सुरू केले ‘मिशन मौसम’