• Download App
    श्रीनगरच्या ‘बडा घर’ गावाची अनुकरणीय प्रथा, हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही; नियम तोडणाऱ्याला टाकतात वाळीत।Dowry ban in Baba Vayil village in Ganderbal district of Srinagar

    श्रीनगरच्या ‘बडा घर’ गावाची अनुकरणीय प्रथा, हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही; नियम तोडणाऱ्याला टाकतात वाळीत

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या गांदरबल जिल्ह्यातील ‘बडा घर’ गावात हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही, असा कठोर नियम लागू आहे. तो तोडणाऱ्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले जाते. हुंडा प्रथा रोखण्यासाठी देशातील गावांनी ‘बडा घर’ या गावाचा आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे. Dowry ban in Baba Vayil village in Ganderbal district of Srinagar

    देशाच्या अनेक भागांत काही चांगल्या तर काही वाईट प्रथा असतात. परंतु, चांगल्या प्रथांचे अनुकरण केल्यास गावात शांतता राहील. श्रीनगरच्या गांदरबल जिल्ह्यातील बाबा वायील गावात हुंडाबंदीची प्रथा आहे. येथे लग्नात सोनेनाणे, हुंडा देण्या-घेण्यास पूर्णतः बंदी आहे.
    निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गावाला ‘बडा घर’ असेही म्हणतात. श्रीनगरमधील या एकमात्र गावात लग्नात सोनेनाणे आणि हुंडा देण्या-घेण्यास पूर्णतः बंदी आहे. मुलीच्या पित्याला लग्नात काहीही खर्च करावा लागत नाही. हुंडा मागितलाच तर मुलाकडच्या मंडळींवर सामाजिक बहिष्कार टाकला जातो. अगदी त्यांच्या घरी अंत्यविधीलाही कुणी जात नाही.



    ‘बडा घर’ गावातील कडक नियमांमुळे लोकजीवनावर खूप चांगला परिणाम दिसून येत आहे. मागील 30 वर्षांत गावात घरगुती हिंसा आणि हुंडय़ासंबंधी एकही घटना घडलेली नाही. वधू पित्याला लग्नात काहीच खर्च येत नाही. त्यामुळे गावात योग्य वयात मुलींची लग्नं पार पडत आहेत.
    गावात मध्यमवर्गीय कुटुंबे अधिक आहेत. ते अक्रोड, शाली विकून किंवा शेती करून उदरनिर्वाह करतात, तर काही जण सरकारी आणि खासगी कंपनीत नोकरीला आहेत. मुलींना ‘बडा घर’ गावात लग्न करून पाठवायला लोक तयार असतात. कारण या गावात मुलींना ओझं समजलं जात नाही. तसंच कुणावर हुंडा देण्यासाठी दबाव येऊ नये म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक लक्ष ठेवून असतात.

    Dowry ban in Baba Vayil village in Ganderbal district of Srinagar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!