विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : तेलंगणात प्रादेशिक भारत राष्ट्र समितीवर मात करून काँग्रेसने सत्ता मिळवली असली तरी, प्रत्यक्षात तेलंगणात “हिरो” वेगळाच ठरला आहे. किंबहुना राज्यातलाच काय पण देशातला तो “डबल जायंट किलर” ठरला आहे. कारण त्याने एकाच वेळी विद्यमान मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री यांना एकाच मतदारसंघात धोबीपछाड दिला आहे. हे उमेदवार दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचे तेलंगणातले बडे नेते कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी हे आहेत!!“Double Giant Killer” in Telangana; BJP’s Katipalli defeated two Chief Ministers at the same time!!
कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि भावी मुख्यमंत्री काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांचा कम्मारेड्डी विधानसभा मतदारसंघात पराभव केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री यांना धूळ चारण्याची जबरदस्त कामगिरी कटिपल्लींनी केली आहे.
हे देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. कारण देशात जायंट किलर अनेक ठरले. अगदी इंदिरा गांधींना हरवणारे राजनारायण इथपासून ते राहुल गांधींना हरविणाऱ्या स्मृती इराणी यांना जायंट किलर म्हटले गेले, पण या “जायंट किलर” समोर फक्त एकच “जायंट” उभा होता. कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांच्यासमोर एक नव्हे, तर दोन जायंट्स उभे होते. के. चंद्रशेखर राव विद्यमान मुख्यमंत्री होते, तर रेवंत रेड्डी भावी मुख्यमंत्री आहेत, पण या दोघांचाही कमारेड्डी मतदारसंघात पराभव करण्याची जबरदस्त कामगिरी कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी यांनी भाजपच्या तिकिटावर केली.
तेलंगणात भाजपची फारशी ताकद नाही. गेल्या विधानसभेत भाजपचा फक्त 1 आमदार होता, पण आता 8 आमदार असतील आणि त्यापैकी एकाच वेळी दोन जायंट्सचे किलर ठरलेले कटिपल्ली वेंकट रमण रेड्डी हे “डबल जायंट किलर” आमदार असतील. त्यांच्यासमोर चंद्रशेखर राव दुसऱ्या स्थानावर राहिले, तर रेवंत रेड्डी तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
अर्थात चंद्रशेखर राव आणि रेवंत रेड्डी हे दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये उभे होते. त्यापैकी कम्मा रेड्डी जरी ते हरले असले तरी चंद्रशेखर राव गजवेल मधून आणि रेवंत रेड्डी कोंडगल मधून विजयी झाले आहेत.
“Double Giant Killer” in Telangana; BJP’s Katipalli defeated two Chief Ministers at the same time!!
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!
- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात
- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत
- व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी