• Download App
    Don’t store medicines asks high court to political leaders

    राजकीय नेत्यांनी औषधांची साठेबाजी करू नये, औषधे जमा करण्याचा न्यायालयाचा आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची राजकीय नेत्यांनी त्यांची साठेबाजी करू नये. सध्या या नेत्यांनी त्यांच्या ताब्यात असलेला औषधांचा साठा देखील तातडीने सरकारकडे जमा करावा. असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिले. Don’t store medicines asks high court to political leaders

    न्या. विपिन संघी आणि न्या. जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. राजकीय नेत्यांच्या साठेबाजीबाबत दिल्ली पोलिसांनी चौकशी केली होती. त्याचा शोध अहवाल देखील आज न्यायालयात मांडण्यात आला पण न्यायालयाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.



    कोरोनावरील उपचारासाठीची औषधे लोकांवरील उपचारासाठी खरेदी केली जात असल्याने त्यांचा वापर राजकीय लाभासाठी होता कामा नये. सध्या नेत्यांनी त्यांच्याकडे असलेला औषधांचा साठी त्यांनी दिल्लीतील आरोग्य संचालकांकडे जमा करावा त्यामाध्यमातून गरीब आणि गरजू लोकांवर उपचार होऊ शकतील.’’ असेही न्यायालयाने आपल्या निर्देशांत म्हटले आहे.

    दिल्लीमध्ये राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर रेमडेसिव्हिर औषधाची साठेबाजी सुरू असल्याने त्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करावा आणि पुढील आठवडाभरामध्ये अहवाल सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

    Don’t store medicines asks high court to political leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार