प्रतिनिधी
नवी दिल्ली : शाॅर्ट – सेलर हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने एका अहवालात स्टाॅक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र सुरवातीलाच्या पडझडीतून अदानी समूह सावरत आहे. भारतीय उद्योग आणि बँकिंग क्षेत्रेही सकारात्मक आहेत. Don’t shout about India; Anand Mahindra told the global media
या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या मदतीला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे अप्रत्यक्षरित्या समोर आले आहेत. सोशल मीडियात सक्रीय असेलेले आनंद महिंद्रा नेहमीच यशस्वी गाथा, प्रेरणा देतील अशा स्टोरीज शेअर करत असतात. आता त्यांनी अदानींना आणि भारतीय उद्योगक्षेत्राला टार्गेट करणाऱ्या जागतिक माध्यमांना चांगलेच सुनावले आहे.
आनंद महिंद्रा ट्विटमध्ये म्हणतात, उद्योग क्षेत्रातील सध्याची आव्हाने जागतिक आर्थिक महाशक्ती बनवण्याच्या भारताच्या महत्त्वकांक्षेला खीळ घालतील की नाही, यावर जागतिक मीडिया अंदाज लावत आहेत. भूकंप, दुष्काळ, मंदी, युद्धे, दहशतवादी हल्ल्यांना भारताने यशस्वीपणे तोंड दिल्याचे मी दीर्घकाळ पाहत आलो आहे. मी एवढेच सांगेन, भारताच्या नादी कधीही लागू नका. भारत प्रत्येक संकटावर मात करतोच करतो!!
Don’t shout about India; Anand Mahindra told the global media
महत्वाच्या बातम्या