• Download App
    रेल्वे स्टेशनवर अकारण गर्दी करू नका ; पुणे रेल्वे विभागाचे प्रवाशांना आवाहन Don't rush to the train station

    रेल्वे स्टेशनवर अकारण गर्दी करू नका ; पुणे रेल्वे विभागाचे प्रवाशांना आवाहन

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर अकारण गर्दी करू नये, कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोचावे.असे आवाहन पुणे रेल्वे विभागाने केले. Don’t rush to the train station

    स्टेशनवरची गर्दी रोखण्यासाठी ३० एप्रिल २०२१ पर्यंत प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नाहीत. फक्त ज्येष्ठ, दिव्यांग, रूग्ण इत्यादींना प्लॅटफॉर्मची तिकिटे ५० रूपये दराने दिली जात आहेत. कन्फर्म व आरएसी तिकिट असलेल्यानाच प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश आणि प्रवासाची परवानगी आहे.



    प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी गर्दी टाळावी

    रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी स्टेशनवर गर्दी करू नये. विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असून त्यामध्ये सेकंड एसी, थ्री एसी, स्लीपर आणि द्वितीय आसन श्रेणीचे कोच आहेत. या विशेष गाड्यांत सामान्य, अनारक्षित कोच नाहीत.

    कन्फर्म तिकीट असलेल्यानी पोचावे

    कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोचावे. रेल्वेचे पीआरएस काउंटर ,आयआरसीटीसी वेबसाईटवरुन तिकीट बुक करण्याची व्यवस्था आहे.

    Don’t rush to the train station

    महत्वाची बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार