विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात तब्बल ८० टक्के खेळणी आयात केली जात असून या माध्यमातून कोट्यवधी रुपये देशाबाहेर जात आहेत. त्यामुळे स्थानिक खेळण्यांना प्राधान्य द्या, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.Don’t rely on forgine toys – Modi
भारतीय खेळणी उद्योगाची जागतिक बाजारपेठेतील भागीदारी वाढवण्याचा हेतू वाढवम्याच्या हेतून आयोजित केलेल्या टॉयकथॉनच्या उद्घाटनात ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये सुमारे सव्वा लाख जणांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यात १७ हजार जणांनी आपल्या कल्पना मांडल्या.
यापैकी १५६७ कल्पनांची निवड करण्यात आली. मोदी म्हणाले की, आजच्या घडीला जागतिक पातळीवर खेळण्यांची उलाढाल १०० अब्ज डॉलर इतकी आहे. त्यात भारताचा वाटा केवळ दीड अब्ज डॉलर आहे. कोट्यवधी रुपये देशाबाहेर जात असून ही स्थिती बदलण्याची गरज आहे.
मुलांचा पहिला संवाद हा या खेळण्यांच्या माध्यमातूनच होतो. लहान मुले खेळण्याशी संवाद साधतात. त्यांना सूचनाही करतात. त्यांच्याकडून काही कामही करून घेतात. कारण या खेळण्यांच्या मदतीने त्यांचे एकप्रकारे सामाजिक जीवन सुरू होते.
Don’t rely on forgine toys – Modi
महत्वाच्या बातम्या
- आपण स्वर्गात राहतो असे कृपा करून सांगू नका, उत्तराखंड सरकारवर न्यायालयाचे ताशेरे
- पुण्यामध्ये सोमवारपासून निर्बंध जैसे थेच ! ; कोरोनाबाबतच्या आढावा बैठकीत सूतोवाच
- कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा तब्बल ८५ देशांमध्ये संसर्ग, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
- हुकूमशाहीच्या अंधारात अत्याचाराचे आवर्त; कोठड्यांमधली दंडुकेशाही; जयप्रकाश, मोरारजींची धरपकड, जॉर्ज फर्नांडिसांच्या भावांचा छळ आणि बरेच काही…