विशेष प्रतिनिधी
पल्लकड – केरळमधील पल्लकड जिल्ह्यातील माथुर गावाच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यालय परिसरात ‘सर’ व ‘मॅडम’ या शब्दांचा वापर करण्यावर प्रतिबंध केला आहे. Don’t call sir, mam to govt. officials
सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्यातील सीमारेषा पुसून टाकण्यासाठी वसातहकाळातील ‘सर’ आणि ‘मॅडम’ या सन्मानीय संबोधनांवर बंदी घालण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने एकमताने घेतला आहे.
तेथील अधिकाऱ्यांना नावाने किंवा त्यांच्या पदाने संबोधित करावे, अशी सूचना केली आहे. अशा संबोधनांचा वापर थांबविणारी माथुर ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ असे संबोधन वापरणे बहुतेकांच्या सवयीचे झाले आहे. पण आता या गावात तरी याला आळा बसणार आहे हे नक्की.
Don’t call sir, mam to govt. officials
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च
- अॅप्स डाऊनलोड करताना जरा जपूनच, तब्बल ४८ हजार फेसबुक अकाऊंटस हॅक करून गैरवापर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही फसवणूक
- जीडीपीनंतर जीएसटीचीही घौडदौड, सलग दुसऱ्यांदा जीएसटी महसूल एक लाख कोटींवर
- असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला