• Download App
    गाढविणीचे दूध चक्क १० हजार रुपये लीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात भोंगा लावून विक्री|Donkey's milk is sold for Rs. 10,000 per liter in Osmanabad district

    गाढविणीचे दूध चक्क १० हजार रुपये लीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात भोंगा लावून विक्री

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : अगदी शुध्द, निर्भेळ दूधही १०० रुपयांपेक्षा जास्त भावाने विकले जात नाही. मात्र, गाढविणीचे दूथ चक्क दहा हजार रुपये लीटरने विकले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच अनेक रोगांवर हे दूथ गुणकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.Donkey’s milk is sold for Rs. 10,000 per liter in Osmanabad district

    उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात गाढविणीचं दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जातेये. त्यासाठी भोंगा लावून प्रचार केला जात आहे. उमरगा शहरातील गावठाणात नांदेड जिल्ह्यातील भोकरचे धोत्रे कुटुंबिय पाल ठोकून राहत आहे. त्यांच्याकडे २० गाढविणी आहेत. या गाढविणीच धोत्रे कुटुंबाचं उपजीविकेचे साधन आहे.



    णी असते. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून विक्री केली जातेय. 10 मिली लीटर दुधासाठी 100 रुपये मोजावे लागतात. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळंही दुधाची मागणी वाढली आहे.मागील २ ते ३ वर्षांपासून नांदेड भागातून ही लोकं उमरगा भागात दूध विक्रीसाठी येतायेत. गाढविणीचं दूध उपयुक्त असल्याचं उमरगावासियांचं म्हणणं आहे.

    गाढविणीच्या दुधात व्हिटॅमिन डी मात्रा अधिक आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्येही गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधा इतकंच हे दूध सकस असल्याचं सांगितलं जातं.
    याबाबत आत्तापर्यंत वैद्यकीय संशोधन झालेले नाही. मात्र, या दुधात जीवनसत्वांचे प्रमाण जास्त असते, असे म्हटले जाते.

    Donkey’s milk is sold for Rs. 10,000 per liter in Osmanabad district

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र