विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : भारतातल्या निवडणुका आता हिंदुत्वाभोवती केंद्रित होतातच, हिंदुत्व विरुद्ध जातीवादी संघर्ष त्याचबरोबर हिंदुत्वविरुद्ध धर्मांधता हे मुद्दे केंद्रस्थानी असतात, पण या हिंदुत्वाचा प्रभाव आता अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीतही पडलेला दिसत असून अध्यक्षपदाचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी हिंदूंच्या रक्षणाचा शब्द दिला आहे. इतकेच काय पण बायडेन प्रशासन आणि कमला हॅरिस हे हिंदूंच्या रक्षणात कमी पडल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. Donald Trump determination to protect Hindus
डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून जगभरातल्या सगळ्या हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचवेळी त्यांनी बांगलादेशातले हिंदूंवरच्या अत्याचाराचा तीव्र निषेध केला. अमेरिकेतल्या हिंदूंच्या रक्षणाचा शब्द दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले :
हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवरील रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो ज्यांच्यावर जमावाकडून हल्ले होत आहेत आणि बांगलादेशमध्ये लूट केली जात आहे, जी संपूर्ण अराजकतेच्या स्थितीत आहे. हे माझ्या कारकिर्दीत मी कधीच घडू दिले नसते. कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी जगभरातील आणि अमेरिकेतील हिंदूंकडे दुर्लक्ष केले आहे. ते इस्त्राईल ते युक्रेन ते आमच्या स्वतःच्या दक्षिण सीमेपर्यंत “आपत्ती” ठरले आहेत, परंतु आम्ही अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवू आणि सामर्थ्याने शांतता परत आणू!!
कट्टरपंथी डाव्यांच्या धर्मविरोधी अजेंड्यापासून आम्ही हिंदू अमेरिकनांचेही संरक्षण करू. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढू. माझ्या प्रशासनात, आम्ही भारत आणि माझे चांगले मित्र पंतप्रधान मोदी यांच्याशी आमची उत्तम भागीदारी मजबूत करू. कमला हॅरिस तुमचे छोटे व्यवसाय अधिक नियम आणि उच्च करांसह नष्ट करतील. याउलट, मी कर कमी केले, नियमात कपात केली, अमेरिकन इतिहासातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था तयार केली. आम्ही ते पुन्हा करू, पूर्वीपेक्षा मोठे आणि चांगले – आणि आम्ही अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवू. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे की दिव्यांचा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देईल!!
Donald Trump determination to protect Hindus
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मौलाना सज्जाद नोमानींना मनोज जरांगेंमध्ये “दिसले” गांधी + आंबेडकर आणि मौलाना आझाद!!
- Bangladesh : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा हिशोब आता होणार
- Rajasthan : राजस्थानात गोध्रा प्रकरण असलेले पुस्तके मागे घेतले; आता शाळेत हा धडा शिकवला जाणार नाही
- Manoj Jarange जरांगेंची दिली हाक नव्या परिवर्तनाची; एकाच खात्यात 2 – 2 मंत्री, 7 – 8 उपमुख्यमंत्री करायची तयारी!!