• Download App
    घरगुती गॅसचा काळाबाजार आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त |domestic gas Black market bursted in solapur

    WATCH : घरगुती गॅसचा काळाबाजार आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    विशेष प्रतिनिधी

    सोलापुर : घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा काळाबाजार करत बेकायदा रिक्षामध्ये इंधन म्हणून भरत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख ४१ हजार २२६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.domestic gas Black market bursted in solapur

    सोलापुरातील प्रभाकर महाराज मठाजवळ जवळकर वस्ती येथील सार्वजनिक शौचालयाच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा साठा करण्यात आला आहे.यामुळे इतरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.



    घरगुती गॅस सिलिंडरचा विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला आहे.हा गॅस टाक्यांमधून रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये भरण्यात येत आहे.अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

    त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केले आहे.या कारवाईत संघरत्न निजलींगप्पा इंगळे रा.बुधवार पेठ मिलिंद नगर , महेश बाबासाहेब कांबळे रा.प्रभाकर महाराज मठा शेजारी आणि लक्ष्मण श्रीमंत पवार यांच्यासह रिक्षाचालक नीलेश भाऊराव गायकवाड , संदीप पांडुरंग तुळसे , नितीन नागनाथ शिरसागर , तुळशीराम बनसिद्ध चवरे आणि अमोल देविदास घुले या आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

    •  सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार
    • पोलिसांनी केली आठ जणांना अटक
    • ८ लाख ४१ हजार २२६ किंमतीचा मुद्देमाल जप्त
    • गॅस टाक्यांमधून रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये
    • सोलापुरातील प्रभाकर महाराज मठाजवळ कारवाई

    domestic gas Black market bursted in solapur

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही