• Download App
    देशांतर्गत विमान प्रवास होणार सोपा, लसीकरण झाले असल्यास आरटीपीसीआर चाचणीची राहणार नाही गरज|Domestic air travel will be easier, no need for RTPCR testing if vaccinated

    देशांतर्गत विमान प्रवास होणार सोपा, लसीकरण झाले असल्यास आरटीपीसीआर चाचणीची राहणार नाही गरज

    देशांतर्गत विमान प्रवास आणखी सोपा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना विमान प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या तयारी केंद्र सरकार आहे.Domestic air travel will be easier, no need for RTPCR testing if vaccinated


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशांतर्गत विमान प्रवास आणखी सोपा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. लसीचे दोन्ही डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना विमान प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या तयारी केंद्र सरकार आहे.

    सध्या विमान प्रवास करायचा असल्यास आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ज्या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे तेथे हे प्रमाणपत्रक आणखी बंधनकारक आहे.



    त्याची मुदत ४८ तासच असल्याने वारंवार विमान प्रवास कराव्या लागणाºयांना वारंवार कोरोना चाचणी करून घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने निर्णय घेणार आहे.

    याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पूरी म्हणाले, आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने आम्ही विमान प्रवाशांसाठीची यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. विविध संस्था आणि आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करून आणि प्रवाशांचा सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन निर्णय घेतला जाईल.

    आरोग्य हा राज्यांचा विषय आहे. त्यामुळे एखादा प्रवासी विमानाने राज्या पोहोचला तर त्याला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मागणे हा राज्यांचा अधिकार आहे.

    हरदीप पूरी यांनी सांगितले की जी-७ च्या बैठकीत आम्ही वॅक्सीन पासपोर्टला विरोध केला आहे. याचे कारण म्हणजे विकसनशिल देशांमध्ये विकसित देशांच्या तुलनेत लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी व्हॅक्सीन पासपोर्टच्या आधारावर परवानगी देणे भेदभावजनक आहे.

    जगातील अनेक देशांमध्ये इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश नाही. ज्या देशांमध्ये परवानगी आहे तेथेही दुसऱ्या देशातून आलेल्या प्रवाशांना दीर्घ काळ पर्यंत क्वारंटाईन राहावे लागते.

    Domestic air travel will be easier, no need for RTPCR testing if vaccinated

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य