• Download App
    सुरक्षा दलांतील श्वानपथकेही होणार आत्मनिर्भर, मुधोळ हाऊंडस, राजपालयम आणि रामपूर हाऊंडस या भारतीय जातींचा होणार समावेश|Dogsquadss in security forces will also self-reliant, Mudhol Hounds, Rajpalayam and Rampur Hounds

    सुरक्षा दलांतील श्वानपथकेही होणार आत्मनिर्भर, मुधोळ हाऊंडस, राजपालयम आणि रामपूर हाऊंडस या भारतीय जातींचा होणार समावेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा महिन्यांपूर्वी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सुरक्षा दलांतील श्वानपथकांमध्ये विदेशी जातीच्या श्वानांपेक्षा भारतीय जातींचा समावेश करण्याचा आग्रह केला होता. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरेल,असे म्हटले होते. त्याप्रमाणे आता मुधोळ हाऊंडस, राजपालयम आणि रामपूर हाऊंडस या भारतीय जातींचा समावेश श्वानपथकांमध्ये होणार आहे. त्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे.Dogsquadss in security forces will also self-reliant, Mudhol Hounds, Rajpalayam and Rampur Hounds

    आपल्या लष्करात् आणि विविध सुरक्षा बलांमध्ये असे अनेक बहाद्दुर श्वान आह जे देशांसाठी आपलं बलिदान देतात. अनेक बॉम्ब स्फोट, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी त्यांनी मोठी आणि महत्वाची भूमिका पार पाडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मला देशाच्या सुरक्षामध्ये श्वानाच्या भूमिकाबद्दल सविस्तार माहिती जाणून घ्यायला मिळली असे म्हटले होते.



    या श्वानपथकांमध्ये भारतीय जातीचे श्वान चांगली कामगिरी बजावू शकतील, असे ते म्हणाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुधोळ हाऊंडसही महत्वाची भूमिका बजावली होती.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी वापरलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आढळलेल्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. मराठा सैन्याने या श्वानांच्या मदतीने मुघल बादशहा औरंगजेबच्या बलाढ्य सैन्यावर हल्ला केला होता. श्वान योध्यांच्या पथकाविषयी इतिहासात आपण वाचले होते असे त्यांनी म्हटले होते.

    महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आढळलेल्या कुत्र्यांच्या जातीविषयी त्यांनी सांगितले होते. याविषयी एक रंजक कथाहीआहे. प्राचीन रेशीम मागार्तून प्रवास करणारे व्यापारी त्यांच्या सुरक्षेसाठी कुत्री वापरत असत. या मार्गावर चीनपासून युरोपपर्यंत इराण आणि अरब देशांमधून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणारी ही कुत्री अरबी व तुर्की जातीचे होते.

    यास पश्चिम आशियातील सालुकी या नावानेही ओळखले जाते. नंतर, अरबी आणि तुर्की जातीच्या या कुत्र्यांना कारवानी असे नाव दिले गेले. या जातीचा उपयोग शिवाजीमहाराज करत होते. हे कुत्रे अतिशय विश्वासू आणि इमानदार असतात. मालकाची सुरक्षा करण्यासाठी आणि शत्रूबद्दल त्यांना माहिती देण्यास नेहमी तयार असतात.

    महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर, या कुत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे प्राण वाचवण्याची एक प्रसिद्ध कहाणी आहे. म्हणूनच महाराजांना या कुत्र्यांची आवड होती आणि त्यांनी त्यांचा शत्रूविरूद्ध त्यांचा वापर करण्यास सुरवात केली. असे म्हटले जाते की ते जेथे जायचे तेथे त्यांच्याभोवीती ही कुत्री असायची.

    या कारणास्तव या कुत्र्यांना मराठा जाती देखील म्हटले जाते. सैन्यात भरती होण्यापूर्वीच त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मराठेशाहीचे पतन होऊन देशात ब्रिटीश शासन स्थापन झाल्यानंतर भारतीय जातींचा वापर कमी होऊ लागला. 1857 पर्यंत ब्रिटीशदेखील या जातींना घाबरत होते. कारण ते उडी मारुन त्यांच्यावर हल्ला करत असत.

    19व्या शतकाच्या अखेरीस या कुत्र्यांचा वापर कमी झाला आणि त्यांची प्रजाती नष्ट होऊ लागली. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत, भारताच्या राजांनी थंड पाळीव जातीमध्ये पैदास केलेल्या परदेशी जातीचे कुत्री ठेवण्यास सुरवात केली.मुधोळचे तत्कालीन शासक मालोजीराव राजे घोरपडे ही अशी व्यक्ती होती जिने भारतीय कुत्र्यांच्या या जातीचे जतन करण्याचे काम केले.

    हा शासक मेवाडच्या सिसोदिया कुळांशी संबंधित होता. सत्तेवर आल्यावर त्यांनी शिकारी व तेथील आदिवासींनी वापरलेल्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. मोठ्या वेगाने शत्रूवर उडी मारण्याचा आणि हल्ला करण्याचा विशेष गुण त्यांच्यामध्ये होता. त्यांनी या जातींचे संरक्षण करण्यास सुरवात केली.

    विसाव्या शतकाच्या सुरूवातीस त्यांनी ग्रेट ब्रिटनला भेट दिली होती आणि तत्कालीन राजाला भारतीय जातीच्या दोन कुत्र्यांची भेट दिली होती. ब्रिटीश राजाने या कुत्र्यांचे नाव मुधोल हाऊंड्स ठेवले. मालोजीराव यांचे निधन झाले आणि त्यांची पत्नी पार्वतीदेवी यांनी पदभार स्वीकारला.

    त्या मुळच्या सौराष्ट्रातील मोडिया रियासतची होती आणि जडेजा राजघराण्यातील आहे. पंतप्रधान मोदी याच भागातील आहेत. सुमारे एक शतकांपूर्वी मराठा सैन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया आणि मुधोळ राजघराण्याने संरक्षित असलेल्या शिकारी कुत्र्यांची जाती पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा दलांत महत्वाची भूमिका बजावणार आहे,

    हा विचित्र योगायोग आहे. पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात श्वानपथकात या कुत्र्यांना का स्थान दिले जात नाही, असा सवाल केला होता. त्याप्रमाणे आता सुरक्षा दलांत या कुत्र्यांचा वापर सुरू झाला आहे.

    Dogsquadss in security forces will also self-reliant, Mudhol Hounds, Rajpalayam and Rampur Hounds

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार