- हिजाबच्या वादावर सडकून केली टीका
विशेष प्रतिनिधी
कर्नाटकपाठोपाठ आता बिहारमध्येही हिजाबचा वाद शिरला आहे. या वादावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. बिहारमधील स्कूल ड्रेसमध्ये हिजाबचा जबरदस्तीने समावेश करण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेत्याने एक व्हिडिओ जारी करत केला आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालू यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, कर्नाटकात ज्या प्रकारे सर तन से जुदा घोषणा दिल्या जात होत्या, नितीश आणि लालू दोघांनीही या घोषणेला पाठिंबा दिला होता. आता लालू आणि नितीशबाबूंच्या राजवटीत बिहारच्या स्कूल ड्रेस कोडमध्ये हिजाब आला आहे. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी नकार दिल्यास ‘शिरच्छेद’ करण्याची धमकी दिली जात आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, नितीश बाबू आणि लालूप्रसाद यांनी सांगावे बिहारचे सनातनी कुठे जाणार? मतांसाठी इथे इस्लामिक राज्य निर्माण करायचे आहे का?
याला कोणी विरोध केल्यास त्याला ‘शिरच्छेद’ करण्याची धमकी दिली जात आहे. बिहार सरकारला राज्याला इस्लामिक राज्य बनवायचे आहे, असा आरोप सिंह यांनी केला.
बिहारमधील शाळांमध्ये जबरदस्तीने हिजाब घालण्याचा आरोप भाजप नेते गिरिराज सिंह यांनी केला आहे. सिंह म्हणाले की, शाळेच्या गणवेशात हिजाबचा जबरदस्तीने समावेश केला जात आहे आणि जेव्हा शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक तसे करण्यास नकार देत आहेत तेव्हा त्यांना ‘शिरच्छेद’ करण्याची धमकी दिली जात आहे.
Does Nitish Babu want to make Bihar an Islamic state Giriraj Singh
महत्वाच्या बातम्या
- काय सांगता! सूर्याला पडले 60 पृथ्वी मावतील एवढे छिद्र; वेगवान सौर वाऱ्यांमुळे रेडिओ कम्युनिकेशन ठप्प होण्याचा इशारा
- I.N.D.I.A ची बैठक खरगेंच्या घरी संपन्न; नितीश, स्टॅलिन आणि अखिलेश अनुपस्थित, ममता म्हणाल्या- 7 दिवसांपूर्वी सांगायला हवे होते
- मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नईत विध्वंस; 72 तास वीज गुल, इंटरनेट बंद; हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पोहोचवले अन्न
- अमित शहांनी लोकसभेत नेहरूंचे पत्रच वाचून दाखवले; म्हणाले- नेहरूंनीच शेख अब्दुल्लांना सांगितले होते, काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे चूक होती