• Download App
    मोदीजी, कोरोना लसीकरणातले मंत्री – पुढाऱ्यांचे व्हीआयपी कल्चर थांबवा; डॉक्टरांच्या देशव्यापी संघटनेची मागणी | Doctors Slam 'VIP Culture': Write Letter To PM Modi About House Calls By Politicians For Testing

    मोदीजी, कोरोना लसीकरणातले मंत्री – पुढाऱ्यांचे व्हीआयपी कल्चर थांबवा; डॉक्टरांच्या देशव्यापी संघटनेची मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – स्वतःला फार मोठे तिसमार खाँ समजून मोठ्या डॉक्टरांना घरी बोलवून कोरोना लसीकरण करून घेण्याच्या व्हीआयपी कल्चरविरोधात डॉक्टरांनीच आपला आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचविला आहे. Doctors Slam ‘VIP Culture’: Write Letter To PM Modi About House Calls By Politicians For Testing

    डॉक्टरांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने (FAIMA) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे व्हीआयपी कल्चर विरोधात तक्रार केली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना मंत्री आणि राजकीय नेते कोरोना चाचण्यांसाठी आणि उपचारासाठी थेट घरी बोलावून घेतात. स्थानिक पातळीवरील दबावापोटी डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला त्यांच्याकडे जावे लागते, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

    डॉक्टरांना आणि मेडिकल स्टाफला चाचण्या आणि उपचारासाठी त्यांच्या घरी बोलवतात. हे प्रकार गैर आहेत, असे परखड मत पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.

    उच्च न्यायालयानेही फटकारले होतेच

    मंत्री आणि राजकीय नेते यांच्या बाबत जे परखड मत असलेल्या फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने (FAIMA) व्यक्त केले आहे, तसेच परखड मत मुंबई उच्च न्यायालयाने देखील व्यक्त केले होते.

    राष्ट्रपती आणि पंतप्रधान जिथे सरकारी रूग्णालयात जाऊन लस घेतात तिथे बाकीचे राजकीय नेते असे कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारला केला होता. ही सुनावणी चालू असण्याच्या आदल्याच दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवारांना घरी जाऊन महाराष्ट्रातल्या सरकारी डॉक्टरांनी आणि मेडिकल स्टाफने कोरोना प्रतिबंधक लस दिली होती.

    त्याच बरोबर बिहार, कर्नाटकातही काही मंत्र्यांनी सरकारी डॉक्टरांना घरी बोलवून लस घेतली होती. याच व्हीआयपी कल्चरवरून उच्च न्यायालयापाठोपाठ आता डॉक्टरांच्या देशव्यापी संघटनेने देखील तक्रार केली आहे. ती थेट पंतप्रधान मोदींकडे केली आहे. हे यातले वेगळेपण आहे.

    Doctors Slam ‘VIP Culture’: Write Letter To PM Modi About House Calls By Politicians For Testing

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट