• Download App
    ओडिशा रेल्वे अपघातातील जखमींवर उपचारासाठी दिल्लीच्या AIIMS मधील डॉक्टरांचे पथक अत्याधुनिक उपकरणांसह भुवनेश्वर मध्ये दाखल|doctors from Delhi's AIIMS arrived in Bhubaneswar with state-of-the-art equipment to treat the injured in the Odisha train accident

    ओडिशा रेल्वे अपघातातील जखमींवर उपचारासाठी दिल्लीच्या AIIMS मधील डॉक्टरांचे पथक अत्याधुनिक उपकरणांसह भुवनेश्वर मध्ये दाखल

    वृत्तसंस्था

    भुवनेश्वर : ओडिशा रेल्वे अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था एम्समधीलAIIMS डॉक्टरांचे एक पथक अत्याधुनिक उपकरणांसह भुवनेश्वर मध्ये दाखल झाले आहे. केंद्र सरकारने भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने या डॉक्टरांच्या पथकाला ओडिशात पाठवले आहे. ओडिशातील बालासोर नजीकच्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सुमारे 1100 जखमींवर उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार एम्स मधील डॉक्टर जातील आणि जखमींवर उपचार करतील. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे.doctors from Delhi’s AIIMS arrived in Bhubaneswar with state-of-the-art equipment to treat the injured in the Odisha train accident



    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन रेल्वे सेवा बहाल करण्याच्या दृष्टीने सूचना दिले आहेतच त्याचबरोबर त्यांनी भद्रक मध्ये सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि तेथील आवश्यकतेनुसार डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर तातडीने तिथे सर्व व्यवस्था करण्यात आली.

    प्रत्यक्ष घटनास्थळी अपघातामुळे जे रुळ उघडले आहेत, तेथे पुन्हा रेल्वे लाईन रूळ व्यवस्थित करण्याचे काम वेगात सुरू आहे. यापैकी डाऊन मेन लाईन दुपारी 12.05 वाजता प्रत्यक्ष सेवेत आणण्यासाठी तयार केली आहे, असे ट्विट अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.

    अपघातामुळे तब्बल 58 रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या, तर 10 गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या होत्या. त्या पुन्हा सेवेत बहाल करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    doctors from Delhi’s AIIMS arrived in Bhubaneswar with state-of-the-art equipment to treat the injured in the Odisha train accident

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही