• Download App
    चार वर्षाखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देऊ नका; केंद्र सरकारचा आदेश। Do not give Dextromethorphan syrup to children under four ; Order of the Central Government

    चार वर्षाखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देऊ नका; केंद्र सरकारचा आदेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे तीन मुलांचा मृत्यू साडेचार महिन्यांपूर्वी झाला होता. याबाबतच्या तपास अहवालात मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्या विषबाधेमुळे ३ मुलांचा मृत्यू झाला, असे उघड झाल्याने चार वर्षांखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. Do not give Dextromethorphan syrup to children under four ; Order of the Central Government

    केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने दिल्ली सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाला याबाबतचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यात म्हंटले आहे की, मोहल्ला क्लिनिक्स/दवाखान्यांना चार वर्षांखालील मुलांना हे सिरप न देण्याबाबत नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.



    खोकला आल्यावर हे सिरप मोहल्ला क्लिनिकमधील मुलांना देण्यात आले. प्रकृती खालावल्याने १६ मुलांना कलावती सरन रुग्णालयात दाखल केले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) सिरपची तपासणी केली. या चाचणीत सिरपचा दर्जा चांगला आढळला नाही. यामुळेच डीजीएचएसने डेक्सट्रोमेथोरफन सिरप तात्काळ मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.

    Do not give Dextromethorphan syrup to children under four ; Order of the Central Government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court : कुटुंबाशी संबंध तोडण्याचा पतीवर दबाव हे मानसिक क्रौर्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला