वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दोन तासांहून कमी वेळेत होणाऱ्या विमान प्रवासात प्रवाशांना जेवण देऊ नये, असा आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सोमवारी काढला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विमान कंपन्यांनी या आदेशच पालन करावे,असे म्हंटले आहे. Do not feed passengers during flights less than two hours, caution due to increased corona infection; New orders to companies
गेल्यावर्षी करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीनंतर देशांतर्गत हवाई वाहतूक २५ मे ला पुन्हा सुरू झाली, तेव्हा काही अटींच्या आधीन राहून विमानात जेवण पुरवण्यास मंत्रालयाने विमान कंपन्यांना परवानगी दिली होती.
देशांतर्गत मार्गांवरील उड्डाणाचा कालावधी दोन तास किंवा त्याहून अधिक असेल, तर संबंधित विमान कंपन्या विमानातील प्रवाशांना जेवण पुरवू शकतील, असे मंत्रालयाने नव्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.
‘कोविड-१९’ आणि त्याचे प्रकार यांची वाढती भीती लक्षात घेऊन विमानातील भोजन सेवेचा आढावा घेण्याचे ठरवले. दोन तासांहून अधिक कालावधीच्या प्रवासात विमान कंपन्यांना केवळ आधीच पॅक केलेले जेवण, नाश्ता आणि पेये पुरवण्याची परवानगी दिली आहे.