विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनावर तैवानच्या शास्त्रज्ञांनी ‘डीएनए’वर (गुणसूत्रे) आधारित लस तयार केली आहे. उंदीर व हॅमस्टर (मोठ्या घुशीच्या आकारातील उंदीर)वर त्याचा प्रयोग केला असता त्यांच्या शरीरात कोरोनाला दूर ठेवणारी प्रतिपिंडे दीर्घकाळ कार्यक्षम राहत असल्याचे दिसून आले आहे. DNA based vaccine is important
कोरोनावरील ज्या लशी सध्या उपलब्ध आहेत त्यात ‘सार्स-सीओव्ही-२’ विषाणू शोधण्यासाठी मानवी रोगप्रतिकारक प्रणालीतील रायबोज न्यूक्लिक ॲसिड (आरएनए) किंवा ‘एमआरएनए’वर अवलंबून राहावे लागते. बहुतेक विषाणूंमध्ये आनुवंशिक घटकाच्या रूपात ‘आरएनए’ किंवा ‘डिएनए’ असते. ‘सार्स-सीओव्ही-२’ विषाणूत ‘आरएनए’आढळले आहे. न्यूक्लेइक आम्ल हे एकेरी व दुहेरी पेडीत असू शकते.
मानवी पेशीत घुसून संसर्ग फैलावणाऱ्या विषाणूंमधील गुणसूत्रांचा या लशीसाठी वापर केला आहे. विषाणूंविरोधात रोगप्रतिकार प्रतिसाद वाढविण्यासाठी ‘डिएनए’ व ‘एमआरएनए’ या दोन्ही प्रकारच्या लशींमध्ये अनुवांशिक घटकांचा वापर केला जातो. संशोधकांच्या मते डिएनए’ लशीची निर्मिती सातत्याने, वेगाने व कमी किमतीत होऊ शकते तसेच लशीच्या वाहतुकीसाठी थंड तापमानाचीही गरज नाही. लसीकरणानंतर आठ आठवड्यांत प्रतिपिंडे तयार होतात अन २० आठवड्यांपर्यंत त्यांची कार्यक्षमता उच्च असते.
DNA based vaccine is important
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यांनी घातलेल्या गोंधळानंतर मोदींनी नोंदवली 44 कोटी लसींची मागणी
- दहा चपात्या, डाळ-भाताने भागेना पहिलवान सुशील कुमारची भूक
- खासगी रुग्णालयांतील लशींचे दर निश्चित; कोव्हिशिल्ड 780 तर कोव्हॅक्सिन 1410 रुपयांना
- PM WITH CM : परत सत्तांतर होणार ; मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींशी भेट म्हणजे राजकीय तडजोडच उदयनराजे भोसले