• Download App
    द्रमुकचा विजय : महिलेने जीभ कापून नवस फेडला ; तमिळनाडूतील धक्कादायक घटना|DMK victory:The woman cut her tongue and made a vow;Shocking incident in Tamil Nadu

    द्रमुकचा विजय : महिलेने जीभ कापून नवस फेडला ; तमिळनाडूतील धक्कादायक घटना

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तमिळनाडूत एका महिलेने आपली जीभ कापून मंदिरासमोर देवीला अर्पण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यात द्रमुकने विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. त्यामुळे तिने विजयासाठी केलेला नवस फेडण्यासाठी हे कृत्य केले आहे.DMK victory:The woman cut her tongue and made a vow;Shocking incident in Tamil Nadu

    माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकने रविवारी झालेल्या मतमोजणीत स्पष्ट बहुमत मिळविले होते.
    वनिता (वय 32), असे नवस फेडणाऱ्या महिलेचे नाव आहे.



    यापूर्वी तिने द्रमुकने विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला तर जीभ कापून देवीला अर्पण करण्याचा नवस केला होता. मतमोजणीत द्रमुक सत्तेवर येण्याचे स्पष्ट होताच ती आज मुथालामन मंदिरात पोचली.

    तेथेच जीभ कापून देवीला अर्पण केली. कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद आहेत. तिने मंदिराच्या गेटबाहेर जीभ कापली आणि ती जमिनीवर कोसळली.तिला रुग्णालयात हलविण्यात आले.

    DMK victory:The woman cut her tongue and made a vow;Shocking incident in Tamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!