विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड गमावल्यानंतर देखील INDI आघाडीतले पक्ष सुधारायला तयार नाहीत. त्यातही तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या नेत्यांची मस्ती कमी व्हायला तयार नाही. DMK MP from Tamil Nadu is loud in the Lok Sabha
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी हार्टलांड मधील तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला हरवून भाजपने विजय मिळवला. त्याची जळजळ INDI आघाडीतल्या नेत्यांच्या तोंडी बाहेर आली. द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार डी. एन. व्ही. सेंथिल कुमार एस. यांनी या तीन राज्यातील मतदारांचा अपमान केला.
हिंदी हार्टलांड मध्येच कायम भाजप जिंकतो. ज्यांना आम्ही “गोमूत्र स्टेट” म्हणतो. फक्त तिथेच का भाजप विजयी होतो. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भाजप येऊ शकत नाही कारण तिथे आम्ही मजबूत आहोत. तेलंगण, आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक मध्ये आमचे राज्य आहे. तिथे भाजपची येण्याची शामत नाही, असे उद्दाम उद्गार सेंथिल कुमार यांनी काढले.
सेंथिल कुमार यांचे बॉस तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माचा अपमान केला होता. सनातन धर्म म्हणजे डेंगी, मलेरिया आणि कोरोना आहे. तो नष्ट करावा, असे उद्दाम उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर तीन-चार वेळा त्यांनी त्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यामुळे देशभरात स्टालिन पिता-पुत्रांविरोधात संताप उसळला होता. त्याची जबरदस्त प्रतिक्रिया तीन राज्यांमध्ये उमटली आणि काँग्रेसला त्या निवडणुकीमध्ये फटका बसला.
याच काँग्रेस प्रणित INDI आघाडीमध्ये स्टालिन यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम हा घटक पक्ष आहे, पण त्याच्या पक्षाच्या नेत्यांच्या उड्डाणपणाचा फटका काँग्रेसला बसूनही काँग्रेस सुधारायला तयार नाही आणि द्रमुकच्या नेत्यांची मस्ती कमी व्हायला तयार नाही, हेच सेंथिल कुमार यांच्या उद्गारातून स्पष्ट झाले.
सेंथिल कुमार यांच्या उद्दाम उद्गाराचा भाजप खासदार अन्नपूर्णा देवी आणि परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी तीव्र निषेध केला. सनातन धर्माचा अपमान करणाऱ्यांना हिंदी राज्यांमध्येच काय पण देशात सर्वत्र सडेतोड प्रत्युत्तर देऊ. त्यांची मस्ती उतरवू, अशा भाषेत मीनाक्षी लेखी यांनी सेंथिल कुमारांना खडसावले.
3DMK MP from Tamil Nadu is loud in the Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…