विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : द्रमुकची घसरण थांबता थांबेना, मस्ती उतरता उतरेना; सनातन धर्माची HIV शी तुलना!!, असे खरंच घडले आहे. “इंडिया” आघाडीतील घटक पक्ष आणि तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या नेत्यांनी सार्वजनिक गरळ ओकून सनातन धर्माची अवहेलना करणे सुरूच ठेवले आहे. DMK leader A. Raja compared sanatan dharma with HIV and leprosy
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन यांनी आधी सनातन धर्माची तुलना मलेरिया, डेंगी, कोरोना या रोगांशी केली होती आणि त्याच्या निर्मूलनाची उद्धट भाषा वापरली होती.
पण आता त्या पलीकडे जाऊन 2 जी घोटाळ्यातला मुख्य आरोपी माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली आहे. उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माची डेंगी, मलेरिया, कोरोना या रोगांशी तुलना केली हे त्यांचे चुकले, कारण ते रोग वैयक्तिक आहेत. पण प्रत्यक्षात सनातन धर्म हा HIV, कुष्ठरोग यांच्यासारखा सामाजिक रोग आहे, असे बेलगाम उद्गार ए. राजा यांनी काढले आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघमची घसरण आणि मस्ती कमी न झाल्याचे ते निदर्शक आहे.
हे तेच ए. राजा आहेत जे 2 जी घोटाळ्यातले मुख्य आरोपी होते. ते यूपीए सरकार मध्ये दूरसंचार मंत्री असताना 2 लाख कोटींचा 2 जी घोटाळा झाला होता. स्पेक्ट्रम वाटपात ए. राजा यांनी तुफान पैसा खाल्ला होता. त्यावरून कोर्टाने त्यांना दोषीही ठरवले होते. ती केस अद्याप बंद झालेली नाही. पण ए. राजा यांनी सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे.
सनातन धर्माविषयी अशी गरळ ओकणारे ए. राजा ते “इंडिया” आघाडीतले तिसरे नेते आहेत. आधी उदयनिधींनी सनातन धर्माविषयी अधिक गरळ ओकलीच, पण त्यांच्यापाठोपाठ लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या जगदानंद यांनी दुसऱ्यांदा गरळ ओकली. मस्तकी टिळा लावून मिरवणाऱ्यांनी भारताला गुलाम केले, असे वक्तव्य जगदानंद यांनी केले. त्यांच्या पाठोपाठ ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना HIV आणि कुष्ठरोगाशी केली. “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांची मस्ती उतरली नसल्याचे ते निदर्शक आहे.
DMK leader A. Raja compared sanatan dharma with HIV and leprosy
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न फसला, दोन दहशतवादी ठार
- नरसिंह राव हिंदुत्ववादी, तर मग सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, पुरुषोत्तमदास टंडन, के. एम. मुन्शी, कृपलानी हे कोण होते??
- कुणबी दाखला : मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी तपासून आठवडाभरात अहवाल; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- पंजाबमधील ‘आप’च्या मंत्री अनमोल गगन मान यांच्या विधानामुळे I.N.D.I.A. मोठा धक्का; म्हणाल्या ‘आमचा करार हा…’