MK Stalin takes oath : द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन यांनी प्रथमच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन हे गृह, सार्वजनिक व सामान्य प्रशासनासहित इतरही विभाग सांभाळणार आहेत. स्टालिन यांच्या समवेत 33 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन यांनी प्रथमच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन हे गृह, सार्वजनिक व सामान्य प्रशासनासहित इतरही विभाग सांभाळणार आहेत. स्टालिन यांच्या समवेत 33 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
स्टालिन यांच्या मंत्रिमंडळात 33 सदस्यांचा समावेश आहे. या 33 सदस्यांपैकी 15 जण प्रथमच मंत्री बनले आहेत. स्टॅलिन यांनी या मंत्रिमंडळात दपराईमुरुगन यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना कायम ठेवले आहे. द्रमुक नेते आणि पक्षाचे सचिव दपराई मुरुगन जलसंपदामंत्री असतील. आधीच्या सरकारमध्ये 2006-11 मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते.
या वेळी मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या 18 मंत्र्यांपैकी दुरुईमुरुगन हेही आहेत. त्याचवेळी चेन्नईचे माजी महापौर एम. सुब्रमण्यम आणि पक्षाचे नेते पी. के. सेकराबाबू पहिल्यांदा मंत्री होतील. मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम यांना आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, तर सेकराबाबूंना हिंदू धार्मिक व धर्मादाय व्यवस्थापन विभाग देण्यात आला.
मंत्रिमंडळात या 33 जणांचा समावेश
पी.के. सेकराबाबू, एस. एस. नासार, चेन्नईचे माजी महापौर सुब्रमण्यम, द्रमुकचे माजी सचेतक सखापनी, पीके मूर्ती, आर. गांधी, एस.एस. शिवशंकर, पलानीवेल त्यागराजन, अनिबल महेश मोय्यामोजी, शिव व्ही. मयनाथन, सी. व्ही. गणेशन आणि टी. मनो थांगराज आहेत. मंत्रिमंडळात दोन महिला प्रतिनिधीही आहेत यात गीता जीवन आणि एन. क्लायवीजी सेल्वराज यांचा समावेश आहे.
DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu
महत्त्वाच्या बातम्या
- Alert For LIC Customers : एलआयसीने कामाच्या दिवसांत केला मोठा बदल, 10 मेपासून लागू हे नियम
- पोलिसांनी सोशल मीडियावर काय करावे व काय करू नये यासाठी केंद्राचे नवे धोरण, युजर्सशी वाद टाळण्याचा सल्ला
- India Corona Cases Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मागच्या १० दिवसांत दर तासाला १५० मृत्यू
- RRR खतरनाक ! स्टँड टुगेदर : टीम एस. एस.राजामौली आलिया,अजय देवगणसह राम चरणचा स्पेशल संदेश
- औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना चोपा; अभिनेता रितेश देशमुख याचे ट्विट