• Download App
    Kamal Hasan तमिळ - कन्नड वाद निर्माण करणाऱ्या कमल हसन यांना DMK ची राज्यसभा खासदारकीची बक्षीसी; काँग्रेस - DMK मध्ये वादाची ठिणगी!!

    तमिळ – कन्नड वाद निर्माण करणाऱ्या कमल हसन यांना DMK ची राज्यसभा खासदारकीची बक्षीसी; काँग्रेस – DMK मध्ये वादाची ठिणगी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बऱ्याच वर्षांपासून राजकारणामध्ये एंट्रीचे वेगवेगळे प्रयोग केलेल्या कमल हसन यांना अखेर मार्ग सापडला. त्यांनी नुकताच तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये वाद निर्माण केला. त्या पाठोपाठ तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रविड मुनेत्र कळघमने (DMK) कमल हसन यांना राज्यसभा खासदारकीची बक्षीसी दिली. त्यामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक त्याचबरोबर काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यात वादाची ठिणगी पडली.

    कमल हसन यांनी आत्तापर्यंत राजकारणात शिरकाव करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला तामिळनाडू विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवल्या, पण त्यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत छोटे-मोठे यश सुद्धा मिळू शकले नाही. कमल हसन यांच्या पक्षाचा गाजावाजा खूप झाला पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे कमल हसन यांचे तामिळनाडू राजकीय महत्त्व कधीच फारसे वाढू शकले नाही.

    पण कमल हसन यांनी कधी अण्णा द्रमुक, तर कधी द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांशी जुळवून घेत आपले राजकारण पुढे रेटायचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना फार मर्यादित यश लाभले कारण तामिळनाडूतले दोन्ही मोठे पक्ष स्वतःचे राजकारण रेटताना इतरांना मदत करण्याची शक्यताच नव्हती.

    “ठग लाईफ”सिनेमाच्या निमित्ताने कमल हसन यांनी चेन्नईतून वाद निर्माण केला. मी आणि माझे संपूर्ण जीवन तमिळ आहे. कन्नड भाषा ही तमिळ भाषेतूनच जन्माला आली. त्यामुळे तुम्ही देखील आमचेच आहात, असे वक्तव्य कमल हसन यांनी कन्नड अभिनेता शिवराज यांना उद्देशून केले. त्यामुळे कन्नड विरुद्ध तमिळ असा वाद निर्माण झाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कमल हसन यांना ठोकून काढले. कमल हसन यांना इतिहास आणि भाषा याचे अजिबात ज्ञान नाही. कन्नड भाषेचा इतिहास किती महान आहे याची त्यांना कल्पना नाही, असे ते म्हणाले, पण याच कमल हसन यांना तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने राज्यसभा खासदारकीची उमेदवारी जाहीर केली. पण त्यामुळे काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यात देखील वाद सुरू झाला.

    DMK annouces Rajya sabha candidates, Kamal Hasan to make parlimentary debut

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    New Income Tax : नवीन आयकर नियमांचा मसुदा जारी; नियमांची संख्या 511 वरून 333 पर्यंत कमी झाली; 1 एप्रिलपासून नवीन प्रणाली लागू

    PM Modi : मोदी म्हणाले- दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही; तमिळ भाषा भारत – मलेशियाला जोडते

    Dalai Lama : दलाई लामा कार्यालयाने एपस्टीन फाइल्सशी संबंध नाकारला; सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांवर खुलासा