• Download App
    DK Shivakumar ready to join BJP with 40 MLAs BJP MLA claims

    डी.के शिवकुमार ४० आमदारांसह भाजपमध्ये जाण्यास तयार – भाजप आमदारचा दावा!

    कर्नाटकात होणार ‘खेला’ होणार असल्याच्या चर्चांना उधाण

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटकचे भाजप आमदार मुनीरथना यांनी शनिवारी दावा केला की उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार काँग्रेसच्या ४० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ते म्हणाले की, शिवकुमार भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत आणि पक्षाने त्यांच्यासाठी दार उघडले तर ते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छा दाखवतील. DK Shivakumar ready to join BJP with 40 MLAs BJP MLA claims

    ते म्हणाले, भाजपला हे चांगलेच ठाऊक आहे, पण तरीही पक्ष शिवकुमारांसाठी दरवाजे उघडणार नाही. आमदार मुनीरत्न म्हणाले, “शिवकुमार एकीकडे दावा करत आहेत की ते भाजपच्या नेत्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश मिळवून देत आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते स्वतः त्यांच्या समर्थकांसह आमच्या पक्षात (भाजप) प्रवेश करू इच्छितात.


    कर्नाटक सरकारने डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध CBI तपास मागे घेतला; भाजपचा आरोप- हे असंवैधानिक, मुख्यमंत्र्यांनी निर्णय बदलावा


    मुनीरत्न म्हणाले की, सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांची आणखी चार पदे निर्माण करण्याची मागणी आहे. अशा स्थितीत काँग्रेसमध्ये राहण्यापेक्षा भाजपमध्ये जाणेच योग्य असल्याचे शिवकुमार यांना वाटते. आमदार मुनीरथना म्हणाले, “आम्ही त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडणार नाही, त्यांना काँग्रेसमध्ये राहू द्या.”

    DK Shivakumar ready to join BJP with 40 MLAs BJP MLA claims

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे