• Download App
    गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची चेष्टा पडली चांगलीच महागात, डीजे प्रदिपला अटक DJ pradeep arrested in Gujrat

    गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची चेष्टा पडली चांगलीच महागात, डीजे प्रदिपला अटक

    विशेष प्रतिनिधी

    बडोदा – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या भाषणाचे विडंबन केल्याच्या आरोपावरून बडोद्यातील एका डीजे अर्थात डिस्क जॉकीला गजाआड करण्यात आले. प्रदिप कहार असे असून तो ३० वर्षांचा आहे. प्रदिप हा डीजे आदी नावाने वेगवेगळ्या सोशल मिडीयावर पोस्ट टाकत असतो. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्याचा आरोप ठेवण्यात आला. DJ pradeep arrested in Gujrat

    रुपानी यांनी बनासकांठा येथे पिकणारे बटाटे फ्रेंच फ्राईज तयार करणाऱ्या मॅक्डोनाल्ड् सेंटरला विकले तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील असे भाषणात म्हटले होते. प्रदिपने त्यातील काही भाग जोडून व्हिडिओ तयार केला.



    दांडीया बाजार परिसरातील कहार मोहल्ला येथे राहणाऱ्या प्रदीपला शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या मुळ भाषणातील काही भागच वापरून त्याने बनावट व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मिडीयावरून व्हायरल केला. हा अब्रूनुकसानीचा प्रकार आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.

    DJ pradeep arrested in Gujrat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट