• Download App
    जम्मू काश्मीरमध्ये टिटवालच्या शारदा मंदिरात तब्बल 75 वर्षांनी मंदिरात दिवाळी साजरी!!Diwali was celebrated in the Sharda temple of Titwal in Jammu and Kashmir after almost 75 years

    जम्मू काश्मीरमध्ये टिटवालच्या शारदा मंदिरात तब्बल 75 वर्षांनी मंदिरात दिवाळी साजरी!!

    विशेष प्रतिनिधी

    टिटवाल : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील शारदा मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली. राज्याच्या कुपवाडा जिल्ह्यातील टिटवाल येथे असलेले शारदा मंदिर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून आहे. या मंदिरात 75 वर्षात पहिल्यांदाच दिवळीची पूजा करण्यात आल्याची माहिती ‘सेव्ह शारदा कमिटी’चे संस्थापक रवींद्र पंडिता यांनी दिली. जम्मू कश्मीर मधून 370 कलम हटवल्यानंतर जो सकारात्मक परिणाम झाला त्यातूनच शारदा मंदिरात प्रथम दिवाळी साजरी झाली. Diwali was celebrated in the Sharda temple of Titwal in Jammu and Kashmir after almost 75 years

    शारदा मंदिरात दिवाळीच्या निमित्त आयोजित पूजेला 104-विजय शक्ती ब्रिगेडचे कमांडर कुमार दास आणि सेव्ह शारदा समितीचे प्रमुख रवींद्र पंडिता उपस्थित होते.यावेळी त्रिभोणी गावातील स्थानिक लोक आणि शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    सत्यनारायणाची पूजा करून उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली. याप्रसंगी स्थानिक तहसीलदार तंगधर इयाद कादरी, डॉ. संदीप मावा, शारदा समिती सदस्य एजाज खान, इफ्तिखार, निवृत्त कॅप्टन इलियास, हमीद मीर आणि त्रिभोणीचे शीख उपस्थित होते.

    देशाच्या फाळणीपूर्वी येथे एक मंदिर आणि गुरुद्वारा होता, जिथे 1947 पर्यंत दिवाळी साजरी केली जात होती. त्यानंतर इस्लामी
    जिहादींनी मंदिर आणि गुरुद्वारावर हल्ला करून ते जाळले. त्यानंतर तिथे पुन्हा कधीच दिवाळी साजरी झाली नाही, पण आता तब्बल 75 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. डिसेंबर 2021 मध्ये या भूमीवर पारंपारिक पूजा करण्यात आली. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सेवा शारदा समितीने मंदिर बांधकाम समिती स्थापन केली. या समितीत तीन स्थानिक मुस्लिम, एक शीख आणि एक काश्मिरी पंडित यांचा समावेश होता.

    Diwali was celebrated in the Sharda temple of Titwal in Jammu and Kashmir after almost 75 years

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!