• Download App
    पंतप्रधान मोदींची देशवासीयांना दिवाळी भेट; तब्बल 80 कोटी गरिबांना आणखी 5 वर्षे मोफत मिळणार रेशन Diwali visit to Prime Minister Modi's countrymen; A total of 80 crore poor will get another 5 years free ration

    पंतप्रधान मोदींची देशवासीयांना दिवाळी भेट; तब्बल 80 कोटी गरिबांना आणखी 5 वर्षे मोफत मिळणार रेशन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जवळपास दोन तृतीयांश लोकसंख्येला दिवाळी भेट देण्याची घोषणा केली आहे. शनिवारी छत्तीसगडमधील दुर्ग येथील सभेत पंतप्रधान मोदींनी ८० कोटी लोकांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) अंतर्गत मोफत रेशन योजना पाच वर्षांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, आम्ही गरीब बंधू-भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे की, त्यांची गरिबी दूर होऊ शकते. गेल्या दहा वर्षांत १३ कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचा दावाही पीएम मोदींनी केला.

    पाच किलो गहू-तांदूळ, एक किलो डाळ

    पाच राज्यांमध्ये निवडणूक आणि पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा गेम चेंजर मानली जात आहे. मोफत रेशन योजनेंतर्गत दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाते. सुमारे साडेतीन वर्षांपासून सुरू असलेली ही योजना आतापर्यंत सरासरी तीन ते सहा महिन्यांनी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.



    मुदत ७ वेळा वाढवली, ४ वेळा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवल्या : कोरोना महामारीच्या काळात मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या मोफत रेशन योजनेला आतापर्यंत ७ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये निवडणुकीच्या वेळी चार वेळा मुदतवाढ जाहीर करण्यात आली. प्रथम जून 2020 मध्ये नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

    बिहारमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार होत्या. नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत वाढ. एप्रिल-मे २०२१ मध्ये बंगाल, आसामसह ५ राज्यांमध्ये निवडणुका होत्या. डिसेंबर २०२१ मध्ये मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ. फेब्रुवारी २०२२ मध्ये यूपी, उत्तराखंडसह ५ राज्यांमध्ये निवडणुका होत्या. मे २०२३ च्या कर्नाटक निवडणुका लक्षात घेऊन ती सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली होती.

    Diwali visit to Prime Minister Modi’s countrymen; A total of 80 crore poor will get another 5 years free ration

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले

    Indian Army : भारतीय लष्कराने जारी केला एक व्हिडिओ अन् पाकिस्तानच्या खोटेपणचा बुरखा फाटला

    Operation sindoor : अणुबॉम्ब टाकायचाय की युद्ध नकोय??, पाकिस्तानातल्या नेत्यांमध्येच गोंधळ; त्यात विमानतळ आणि लष्करी तळांच्या नुकसानीची भर!!